राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायकाने केला असा काही कारनामा
Glamour is not important for him but a lovely gift given by his fan is quite important ; चाहत्याची संस्मरणीय पोचपावती

X
Shreekala Abhinave20 Oct 2021 6:16 AM GMT
या गायकाने केला असा काही अनोखा प्रयोग कि तुम्हीही व्हाल थक्क
स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आपली नेहमीच धडपड असते मात्र आपल्यातीलच एकाने स्वतःची ओळख लपवून असा काही प्रयोग केला आहे की, ते पाहून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याने एका भिकाऱ्याचे रूप घेतले आणि पदपथावर बसून सुरेल आवाजात गाणे गट बसला होता. त्याच्या आजूबाजूने जाणाऱ्या अनेक [व्यक्ती त्याच्याकडे पहात होत्या, थांबून त्याचे गाणे ऐकत होत्या. मात्र एक तरुण सोनूकडे आला त्याने त्याचे गाणे क्षणभर ऐकले. त्याचा आवाजही रेकॉर्ड केला आणि गुपचूप त्याच्या हातात १२ रुपये टेकविले. सोनू निगम जेव्हा त्याच्या मूळ रूपात आला तेव्हा त्याने हि गोष्ट आवर्जून नमूद केली. त्याला मदत केलेल्या व्यक्तीचा तो फॅनच झाला. त्याला मिळालेले १२ रुपये त्याच्यासाठी इतके अनमोल ठरले कि सोनुने त्या १२ रुपयांची स्वतःच्या ऑफिसमध्ये फ्रेम करून ठेवली आहे. ती मदत त्याला लाखो रुपयांचे रोवोर्ड देणारी ठरली. खरंतर अशा प्रकारचा प्रयोग करणारा सोनू निगम एकटाच नाही तर यापूर्वी देखील अनेक कलाकारांनी असा प्रयत्न केला आहे. दीपिका पदुकोनने छपाक सिनेमासाठी ऍसिडने भाजलेल्या तरुणीचा गेटअप करून शॉपिंग केली होती. तेव्हा तिला देखील ओळखण्यास सगळेच असमर्थ ठरले होते. मिस्टर परफेशनिस्ट आमिर खान देखील पिकेसिनेमादरम्यान एका नाविकासोबत वेषांतर करून प्रवास केला होता. कलाकारांचा असा काही प्रयत्न त्यांच्या चाहत्यांसाठी वेगळाच अनुभव देऊन जातो. त्यामुळे आपणही थोडंसं चौकस राहुयात कदाचित आपलाही एखादा आवडता कलाकार वेषांतर करून आपल्यासोबत कॉफी घेत असेल.
Next Story