Janmarathi

परिणीति चोपड़ा यांचा साइना सिनेमा चा ट्रेलर प्रदर्शित

बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल यांच्या जीवनावर आधारित असलेला सिनेमा साईना चा ट्रेलर टी सिरीज या कंपनीद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे.

परिणीति चोपड़ा यांचा साइना सिनेमा चा ट्रेलर प्रदर्शित
X

बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल यांच्या जीवनावर आधारित असलेला सिनेमा साईना चा ट्रेलर टी सिरीज या कंपनीद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. परिणीति चोपड़ा यांनी ट्विट करून या विषयी त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

परिणीति चोपड़ा यांनी हा ट्रेलर महिला दिना दिवशी प्रसारित केला. परिणीति चोपड़ा ह्या या सिनेमामध्ये सायना नेहवाल यांची भूमिका निभावणार आहेत. हा सिनेमा २६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडिया वर या ट्रेलर ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमा साठी परिणीति चोपड़ा यांनी खूप मेहनत घेतली आहे. बॅडमिंटन हा खेळ त्यांच्यासाठी सोपा नोहता.

परिणीति चोपड़ा यांनी ट्विट करताना लिहिले आहे की या "महिला दिनाचा मला अभिमान आहे - सायना". या सिनेमाचे निर्देशन अमोल गुप्ते यांनी केले आहे. या सिनेमामध्ये आपल्याला परिणीति चोपड़ा बरोबर मानव कौल, परेश रावल, अंकुर विकल हे कलाकारांनीही काम केले आहे.

Next Story