Janmarathi

रणवीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह त्यांची आई नीतू यांनी केली पोस्ट शेअर

रणवीर कपूर झाले करुणा पॉझिटिव्ह त्यांची आई नीतू यांनी पोस्ट शेअर करत दिली याची माहिती.

रणवीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह त्यांची आई नीतू यांनी केली पोस्ट शेअर
X

रणवीर कपूर यांचे ब्रह्मास्त्र सिनेमाची शुटिंग सध्या चालू होती. पण आता मिळालेल्या माहितीनुसार रणवीर कपूर हे कोरोना पॉझिटिव झालेले असून त्याची माहिती त्यांच्या आई नीतू यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिलेली आहे.

नीतू सिंह यांनी रणवीर कपूरचा फोटो टाकत हे लिहिले आहे की "आपल्या सगळ्यांच्या चिंतेसाठी आणि शुभेच्या साठी तर नमस्कार, रणवीर ची कोरोणाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. तो त्या वरील औषध घेत आहे." आणि त्यांच्या स्थितीत सुधारणा होत आहेत. त्यांनी स्वत: ला अलग ठेवलेले आहेत आणि त्याबद्दल सर्व प्रकारच्या खबरदारी घेत आहेत.

नीतू सिंह सुद्धा डिसेंबर मध्ये त्यांचा सिनेमाच्या शूटिंग दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या.

रणवीर कपूर सध्या त्यांच्या ब्रह्मास्त्र हा ॲक्शन सिनेमा करत आहेत. हा सिनेमा आयान मुखर्जी द्वारा लिहिला गेला आहे. तर सिनेमाचे निर्माते हे करण जोहर आहेत. या सिनेमा मधील इतर सहकलाकारांमध्ये आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मोनि रॉय, नागार्जुन दिसून येतील.

Next Story