Janmarathi

Video: आधी करारनामा मग विवाह! खेडमध्ये 'या' ६ अटींवर पार पडला आगळावेगळा विवाह सोहळा....!

Video: आधी करारनामा मग विवाह! खेडमध्ये या ६ अटींवर पार पडला आगळावेगळा विवाह सोहळा....!
X

Video: आधी करारनामा मग विवाह! खेडमध्ये 'या' ६ अटींवर पार पडला आगळावेगळा विवाह सोहळा....!

Unique Marriage: जशी प्रत्येकची लव्हस्टोरी वेगळी असते, तशीच प्रत्येक लग्नाची कहाणी ही वेगळीच असते... मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो... आता अशाच आगळावेगळा विवाह पुणे जिल्यातील खेड तालुक्यात घडला आहे. नवरी आणि नवरदेवाने एकमेकांसमोर काही अटी ठेवल्या आणि अटी ऐकूणच सगळे पाहुणेराउळे आश्चर्यचकीत झाले. आजकाल विवाहपूर्वी नवरा- नवरी यांच्यामध्ये काही बाबतीत करारनामा होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. हा बदल छोट्या शहरात अजून दिसत नसला, तरी बऱ्याच मोठ्या शहरात आता हा बदल स्वीकारला जात आहे.

विवाह म्हंटल की, मुलगा-मुलगी दोघे नव्या आयुष्याच्या सुखी संसाराची सोनेरी स्वप्न पहातात. मात्र ही स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं असतं. असंच एकमेकांना समजूतदार पणाचा करारनामा लिहून देत-घेत आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील कृष्णा लंबे आणि मुलगी सायली ताजणे यांचा विवाह सोहळा मंचर येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात संपन्न झाला.

मात्र, या विवाह सोहळ्यात अगळावेगळा लग्नाचा करारनामा लोकांना दाखवण्यात आला. यावेळी नवरा-नवरी आणि साक्षीदार म्हणून मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांनी स्वाक्षरी केली. लग्नाच्या बंधनात अडकत असताना नवविवाहित दामप्त्यांना एकमेकांकडुन असणाऱ्या आपेक्षा या लग्नच्या करारनाम्यामध्ये लिहून घेण्यात आल्या आहेत.

वाचा "लग्नाचा करारनामा"

१) कृष्णा: सायलीचे म्हणणे नेहमी बरोबरचं असेल...!

२) सायली: मी कृष्णाकडे शॉपींगसाठी कधी ही हट्ट धरणार नाही...!

३) सायली: मी कृष्णाला मित्रांबरोबर फिरायला, पार्टीलाजायला आडवणार नाही. ( फक्त महिन्यातून दोन वेळा)

४) कृष्णा: मी सायलीची आणि आई वडिलांची ही सेवा करेल...!

५) सायली: मी कृष्णाचे मित्र घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतः जेवण बनवेल...!

६) आमच्यात जरी वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एक दिवसात मिटवू......!

अशा या सहा अटींवर हा विवाह सोहळा पार पडला.

लग्नानंतर मुलगा-मुलगी आणि आई-वडील आणि कुटुंबातील इतर नातेवाईक यांच्या सोबत होणाऱ्या वादाच्या घटना रोजच आपल्यला पहायला मिळतात. या ही सर्व गोष्टी ही टाकल्या जाव्यात आणि लग्नापासून सुरु झालेले आयुष्य सुख, समाधान आणि खेळीमेळीच्या वातावरणात जावं अशीच भावना या निमित्ताने व्यक्त केल्या आहेत. या लग्नाच्या करारनाम्याची चर्चा सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे.

Next Story
Share it