Janmarathi

Girl Fight Video: एक फुल, दो माली; बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल.....!

Girl Fight Video: एक फुल, दो माली; बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल.....!
X

Girl Fight Video: एक फुल, दो माली; बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल.....!

Girl Fight Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मुलीसाठी दोन तरुणाचा राडा होतो असं ऐकलं होत. पण या ठिकाणी कहाणी वेगळीच आहे, एका तरुणासाठी दोन कॉलेज तरुणींमध्ये तुफान राडा झाल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. यवतमाळ, वणीतील शिवाजी पार्क लव्हर्स पॉईंट बनल्यांचं चित्र समोर येत आहे. शिवाजी पार्क मध्ये एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सिनेमामध्ये दाखवतात, त्याप्रमाणे 'एक फुल, दो माली' अशा ही घटना आहे.

वणी नगरपालिकेच्या शिवाजी पार्कमध्ये एका तरुणासाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. दोन तरुणींसोबत एका तरुणाचं लपूनछपून रिलेशनशिप सुरु होतं. २७ फेब्रुवारी रोजी अचानक दोन्ही मुली आमनेसामने आल्या आणि सत्य समोर आलं आणि मग काय याच कारणावरुन दोन्ही तरुणींमध्ये जोरदार वाद सुरु झाला. या वादाचे रुपांतर तुफान हाणामारीत झालं. या हाणामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओतील तरुणी कॉलेजमधील असल्याचं दिसून येत आहे. या तरुणींनी एकमेकींचे केस उपटून आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारी केली आहे. तरुणींनी एकमेकींना शिवीगाळ केली आहे. ही हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांची चांगलीच गर्दीही जमली असून उपस्थितांनी याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

Next Story
Share it