Video: सलमान खानच्या बिली बिली गाण्याचा पहिला व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्का बसला, काय घडले ते जाणून घ्या......!

Video: सलमान खानच्या बिली बिली गाण्याचा पहिला व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्का बसला, काय घडले ते जाणून घ्या......!
बॉलीवूडचचा भाईजान अर्थात सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील बिली बिली गाण्याचा लेटेस्ट टीझर रिलीज करून देण्यात आला आहे. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून गाण्याची पहिली झलक दाखवली आहे. त्याचबरोबर बिली बिली गाण्यामधील सलमान खानचा लूक पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.
वास्तविक, या गाण्यात अभिनेत्याचा तरुण लूक पाहायला मिळत आहे, त्यासाठी चाहते आता त्याचे जोरदार कौतुक करताना दिसत आहेत. सूटबूटमधील भाईजानच्या डॅशिंग लूकमुळे नेटिझन्स खुश झाले आहेत. त्याचवेळी पूजा हेगडेही तिच्या किलर स्टाईलची जादू चालवताना दिसली. काही सेकंदांची ही क्लिप रिलीज होताच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता चौपट झाली आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'सर आता वाट पाहवत नाही' तर दुसऱ्याने लिहिले की, 'सलमान खानचा चित्रपट येण्यापूर्वीच हिट होतो.' तिसऱ्याने लिहिले, 'एक नंबर बघ भाऊ.' याशिवाय, सर्व वापरकर्ते अशाच प्रकारे सुपरस्टारची स्तुती करताना दिसले.
बिली बिली हे गाणे उद्या म्हणजेच २ मार्च रोजी रिलीज होणार आहे. दुसरीकडे, चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, किसी का भाई किसी की जान या वर्षी एप्रिलमध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडे व्यतिरिक्त पलक तिवारी, शहनाज गिल, राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम सारखे स्टार्स देखील दिसणार आहेत.