Janmarathi

रणवीरच्या नवनव्या लुकने घायाल होतेय पब्लिक!

तरूणांसाठी रणवीर सिंग आजच्या सोशल मिडीयावरचा फॅशन सेंसेशन बनला आहे. त्याचे नवनवीन लुक चर्चेचा विषय ठरतात.

रणवीरच्या नवनव्या लुकने घायाल होतेय पब्लिक!
X

रणवीरच्या नवनव्या लुकने घायाल होतेय पब्लिक!

रणवीरचे हे खास लुक तुम्ही पाहिलेत का?


एखाद्या अभिनेत्रीचे फोटो ज्या प्रमाणे युवकांसाठी चर्चेचा विशेष ठरतात त्याचं प्रमाणे रणवीर सिंग आजच्या सोशल मिडीयावरचा फॅशन सेंसेशन बनला आहे. तरुणांना तो त्याच्या पेहरावांमुळे नेहमीच ठक्क करत असतो. दर वेळेस काहीतरी वेगवेगळे करण्याच्या प्रयत्नात तो दिसतो. हे त्यानी परिधान केलेल्या पोशाखावरून त्याच्या अंगात असलेला अतरंगीपणा स्पष्ट दिसतो. या पोशाखांमुळे तो सर्व सोशल मिडीया माध्यमामध्ये नेहमीच चर्चेचा भाग असतो. त्याच्या या भन्नाट शैलीमुळे अनेक मुली त्याच्यावर फिदा आहेत. इतकेच नव्हे तर हे लुक साकारताना त्यांनी त्याच्या सहचारिणी दिपिकाला देखील सामिल झालेली दिसून येते. आज केलेल्या पोस्टसह त्याची हे त्याचे नवे लुक एकदा पहा.


डॅशींंन गाॅगल्स सोबत गुसी जॅकेट घालून त्याचा लुक खुपच भन्नाट दिसत आहे. हा फोटोशुट करताना त्यांनी त्याची सौम्य चेहर्याची आदा चाहत्यांना दाखवली आहे. त्याच्या या फोटो वर चाहत्यांनी काही तासाभारातच लाइक्सचा पाऊस पाडला आहे. हा फोटो त्यांनी त्यांच्या स्वतःच्या इस्टाग्राम व इतर सोशल मिडीया प्लॅटफोर्मस वर शेअर केला आहे. पण हे फोटो पोस्ट करताना त्यांनी त्यावर कोणतेही कॅप्शन दिले नाही. या फोटो मध्ये त्याचा चेहरा अत्यंत निरागस आणि मन मोहक आहे. या फोटोंच्या सोबतीनेच त्यांनी काही अतरंगी फोटोही याआधी सोशल मडिया माध्यमांवर शेअर करत चाहत्यांना स्वतःचे वेगळेपणा दर्शवला आहे.वरील फोटो त्यानी काही दिवसांपुर्वी त्यांच्या सोशल मिडीया साइट्सवर अपलोड केला आहे. नेटकरीमंडळींंना हे फोटोज तितकेच खास आणि अतरंगी होते. या आधीच्या काही वेषभूषांपैकी हा पेहराव काही विचित्र म्हणावा लागेल. पण तो तर बाबा आहे काही करू शकतो असे म्हणतं जवळ जवळ आवडीच्या कलाकाराला दशलक्षाच्या घरात लाइक्स मिळवून देल्या आहेत. पण रणवीरची हि वेशभूषा फारच वैचारिक म्हणावी लागेल, कारण ह्यातून त्याने समलिंग भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेले आहे.
एकीकडे अल्लाउद्दीन खिलजी अशी कठोर आणि क्रुर भूमिका पार पाडून अंगावर काटा आणणार अभिनय करतो तर दुसरीकडे त्याच्या मनमोहक हस्याने तो सर्वांच्या मनाला भूरळ पाडतो


घातलेली बेलबाॅटम जीन्स काही वेगळीच झक्कास दिसते आहे रणवीरवर. स्टाइलमध्ये पोस्ट केलेला हा इस्टाग्रामवरचा फोटो.फॅशन ट्रेन्ड जुना असो किंवा नवीन कसे तयार होऊन पब्लिकला क्रेजी कसे करावे हे रणवीरला अचूक ठाऊक आहे.


जसा त्याचा अंदाज आहे, तो अंदाज बोलण्यातून, चेहर्यावर तो मिश्किलपणा दिसतो. हा फोटो अपलोड करताना म्हणतो "बेटा स्वेटर पेहनो".या फोटोमध्ये त्यांनी स्वतःला चेलेंज दिल्याचे भासते. कारण पजामा टाईप पॅंन्टमध्ये अंगावर टिशर्ट व जॅकेट हे एक अदृभूत काॅम्बिनेशन म्हणता येईल. ज्यामध्ये त्याची हेअरस्टाईलही तेवढीच भाव खाऊन गेली आहे.


Next Story