Janmarathi

Video: या अभिनेत्रीची स्टाईल बघून एका चाहत्याने तिच्या समोर ठेवला लग्नाचा प्रस्ताव......!

या अभिनेत्रीची स्टाईल बघून एका चाहत्याने तिच्या समोर ठेवला लग्नाचा प्रस्ताव......!
X

या अभिनेत्रीची स्टाईल बघून एका चाहत्याने तिच्या समोर ठेवला लग्नाचा प्रस्ताव......!

अतिशय गोंडस दिसणारी ही अभिनेत्री चांगलीच लोकप्रिय आहे. मृणाल ठाकूरने नेहमीच आपल्या सौंदर्याने सर्वांना प्रभावित केले आहे. सध्या एका चाहत्याचे मन तिच्यावर आले आहे, ज्याने तिला लग्नासाठी प्रपोज केल आहे. सीता रामम फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या साधेपणाने सर्वांची मने जिंकली आहेत. तिच्या सौंदर्याने चाहते इतके मंत्रमुग्ध झाले की, एका चाहत्याने तिला लग्नाची मागणीही घातली. मृणालने एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये ती तिचे दागिने घालताना दिसत आहे. सोफ्यावर बसून ती वेगवेगळ्या पोज देत होती. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

मृणालचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्याला त्याच्या मनावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि 'माझ्या कडून हे नाते पक्के झाले' अशी टिप्पणी केली. ही टिप्पणी बघून मृणाल ने लगेच रिप्लाय दिला कि, माझ्या बाजूने नाही. या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंटही केल्या आहेत. मृणालने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा व्हिडिओ आता क्यूट दिसत आहे, कदाचित मी तो नंतर डिलीट करेन.

मृणाल ठाकूरच्या या व्हिडिओवर ईशा गुप्ता कमेंट्स केली आहे, की, कृपया असे करू नका. सोनी राजदाननेही तू अप्रतिम दिसत असल्याचे कौतुक केले. सुरवातीला मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर काम करायला सुरुवात केली होती. तिच्या अप्रतिम अभिनयाने लोकांना प्रभावित केल्यानंतर निर्मात्यांचे तिच्याकडे लक्ष वेधले आणि आता ती मोठ्या पडद्या वर राणी बनली आहे.

सीता रामममधून लोकप्रिय झालेल्या मृणाल ठाकूरने मोठ्या पडद्यावर अनेक अप्रतिम अभिनय दिले आहेत. फरहान अख्तरच्या अपोजिट तुफानमध्ये ती खूप गोंडस दिसत होती. जर्सीमध्ये शाहिद कपूरच्या अपोजिट पडद्यावर तिने प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली. कंगना राणौतनेही तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत मृणाल ठाकूरला स्थान दिले आहे.

Next Story
Share it