Janmarathi

रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबाची लव्हस्टोरी खूपच मनोरंजक आहे........पाहा फोटो !

रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबाची लव्हस्टोरी खूपच मनोरंजक आहे........पाहा फोटो !
X

रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबाची लव्हस्टोरी खूपच मनोरंजक आहे........पाहा फोटो !

तुम्हाला माहित असेल की रवींद्र जडेजा मैदानावर त्याच्या आक्रमक वृत्तीसाठी ओळखला जातो. मग ती फलंदाजी असो वा गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण. तो मैदानावर कोणत्या हि देशाच्या टीम विरुद्ध प्रत्युत्तर द्यायला वेळ घेत नाही. असाच काहीसा आक्रमकपणा त्यांच्या लग्नातही पाहायला मिळाला.

खरं तर, रवींद्र जडेजाच्या लग्नादरम्यान खूप हवाई गोळीबार झाला होता, त्याबद्दल पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. जडेजा हा खानदानी राजपूत कुटुंबातील आहे. त्यामुळे राजपूत समुदायात विवाह दरम्यान गोळीबार करणे ही एक सामान्य प्रथा आहे.

रवींद्र जडेजाने एप्रिल २०१६ मध्ये रिवाबा सोलंकीशी लग्न केले आहे. त्यांच्या कॉलेज पासून चालत आलेल्या प्रेमकथेचे रुपांतर काही काळानंतर जुळून आलेल्या विवाहात झाले.

जडेजाच्या कुटुंबीयांची इच्छा होती की त्याने लवकर लग्न करावे, परंतु जडेजा क्रिकेटमध्ये इतका मग्न होते की त्यांनी इतर गोष्टींकडे लक्ष दिले नाही. याच काळात जडेजाच्या कुटुंबीयांनी जडेजासाठी त्यांच्या फॅमिली मित्राच्या मुलीची निवड केली.

जडेजाची बहीण नयनाची पण खास मैत्रिण होती रिवाबा आणि नायनानेच जडेजाची ओळख करून दिली होती. असे म्हटले जाते की, दोघेही एका पार्टीदरम्यान भेटले होते आणि पहिल्याच भेटीत जडेजा रिवाबाच्या प्रेमात पडला.

या भेटीनंतर दोघांनीही एकमेकांची ओळख करून घेतली आणि इथून दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली आणि प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलं. जडेजा आणि रिवाबा यांच्या भेटी नंतर तीन महिन्यांतच एंगेजमेंट झाली. यानंतर लवकरच दोघांनी लग्न केले. जडेजाने लग्नात पिंक कलरची शेरवानी परिधान केली होती. तो राजपुत्रापेक्षा कमी दिसत नव्हता. तर रिवाबा पारंपारिक लाल, हिरव्या आणि केशरी रंगाच्या लेहेंग्यात दिसली.

रवींद्र जडेजा लग्नाच्या एका वर्षानंतर वडील झाला. या जोडप्याला निध्याना नावाची मुलगी आहे. रवींद्र आणि रिवाबा त्यांच्या मुलीसोबतचे फोटो शेअर करतात. रिवाबाचे वडील व्यापारी असून आई रेल्वेच्या अकाउंट्स विभागात काम करते. रिवाबाने राजकोटमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्या सध्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत.

Next Story
Share it