Janmarathi

Video: वरती मध्ये फोटो काढत असताना थेट गटारात पडली, सर्वांन समोर महिलेची फजेती....!

Video: वरती मध्ये फोटो काढत असताना थेट गटारात पडली, सर्वांन समोर महिलेची फजेती....!
X

Video: वरती मध्ये फोटो काढत असताना थेट गटारात पडली, सर्वांन समोर महिलेची फजेती....!

काही लोकांना फोटो आणि सेल्फी काढण्याची प्रचंड आवड असते. ही मंडळी फोटो काढण्यात अगदी मग्न होऊन जातात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काही जणांनी फोटो काढण्याच्या नादात जीव पण गमावलेला आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ. एक महिला लग्नात नवरदेव आणि नवरीचे मांडवातून बाहेर पडताना त्यांचे फोटो काढत होती. पण या फोटो काढण्याच्या नादात ती हळूहळू मागे जाऊन थेट गटारात पडली. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत असून नेटकरी त्यावर भानट प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

नवरा-नवरी मांडवातून बाहेर रस्त्यावर येत होती. बाहेर येत असताना एक महिला मोठ्या उत्साहानं ते क्षण आपल्या मोबाइल मध्ये कैद करत होती. नवरा-नवरीसोबत चालताना हळूहळू ती रस्त्याच्या कडेला पोहोचली. पण तिला फोटो काढण्याच्या नादात काही भान राहिले नाही आणि नको तेच घडलं. ती महिला फोटो काढता-काढता सरळ गटारात जाऊन पडली. मग इतर लोकांनी तिला गटारातून बाहेर काढलं. या अपघातामुळे बिचारीचा फोटो काढण्याच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं. हा विडिओ Hyderabadi__jaan या इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १ कोटी पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. शिवाय त्यावर अनेकांनी गंमतीशीर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. एका ने या विडिओ वर, 'तरी पण वरात थांबली नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Next Story
Share it