Video: उर्फी जावेदच्या ड्रेसला इतके छिद्र, ट्रोलर्स म्हणाले- उंदरा सोबत रात्र घालवली का ?

Video: उर्फी जावेदच्या ड्रेसला इतके छिद्र, ट्रोलर्स म्हणाले- उंदरा सोबत रात्र घालवली का ?
उर्फी जावेद अलीकडेच तिच्या सेक्सी लूकमध्ये मुंबई विमानतळावर दिसली. उर्फी जावेद नेहमीच वेगवेगळ्या फॅशन मध्ये दिसत असते. तिची फॅशन बघून फॅन हैरान होतात. उर्फीला या लुक मध्ये पाहून युजर्सनी तर तिच्या कपड्यांवर आणि स्टाइलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उर्फी जावेदच्या स्टाईलने पुन्हा एकदा लोकांना आजूबाजूला पाहायला भाग पाडले आहे. आपल्या असामान्य शैलीने लोकांना आश्चर्यचकित करणाऱ्या उर्फी जावेदने अलीकडेच एक अप्रतिम कट आणि फाटलेला ड्रेस परिधान केला होता. अशा परिस्थितीत तिच्या ड्रेसमधील छिद्रे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. हा ड्रेस परिधान करून ती मुंबई विमानतळावर पोहोचली.
उर्फी जावेदने तिच्या लेटेस्ट लुकमध्ये डेनिम जीन्स आणि व्हाइट टॉप घातला होता. डेनिम जीन्सला हि बरीच छिद्रे होती आणि टॉपची अवस्था तर विचारूच नका. उंदराने ड्रेसचा बँड वाजवल्यासारखे वाटत होते. उर्फीच्या ड्रेसची हालत, इतने छेद की खुद उर्फी भी कनफ्यूज हो जाएं की सांस कहां से लें और... या म्हणी सारखी झाली. सोशल मीडियावर लोक उर्फी जावेदच्या ड्रेसची खिल्ली उडवू लागले आहेत.
उर्फी जावेदचा विडिओ पाहून युजर्सनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने विचारले कि, तुमचे कपडे काय खातात, त्याचबरोबर कपडे उंदरांनी कुर्तडल्याचा प्रश्नही लोकांनी उपस्थित केला. हाय मोरी मैया छोरी उंदरांसोबत रात्र घालवली, अशी मजेशीर प्रतिक्रिया एका यूजरने दिली आहे. तसेच, हा व्हिडिओ विमानतळावर बनवण्यात आला असून उर्फी जावेदही घाईत दिसली. ती वारंवार पापाराझीच्या ग्रुपला तिला जाऊ देण्यास सांगत होती. यासोबतच तिचा पासपोर्टही विसरल्याचे कळले.