Janmarathi

Video: सबसे कातील कोण...? गौतमी पाटील कि संध्या पाटील......पाहा व्हायरल व्हिडिओ !

Video: सबसे कातील कोण...? गौतमी पाटील कि संध्या पाटील......पाहा व्हायरल व्हिडिओ !
X

Video: सबसे कातील कोण...? गौतमी पाटील कि संध्या पाटील......पाहा व्हायरल व्हिडिओ !

सबसे कातिल गौतमी पाटील हा डायलॉग सध्या सोशल मीडिया वर जोरदार सुरु आहे. गौतमीच्या प्रत्येक लावणी कार्यक्रमांना तरुणांची तुफान गर्दी होत आहे. ही धुळे जिल्ह्यातील गौतमी पाटील महाराष्ट्राच्या लाखो तरुणांच्या हृदयावर राज्य करत आहे. गावागावात होणाऱ्या तिच्या कार्यक्रमांना इतकी गर्दी होते की अक्षरश: राडा होत आहे आणि पोलिसांना लाठीचार्जही करावा लागतो. तर दुसरीकडे गौतमीला टक्कर देण्यासाठी संध्या पाटील हे नाव तुफान चर्चेत आहे.

गौतमी पाटीलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तर प्रत्येक कार्यक्रमासाठी गौतमी १ ते २ लाख रुपये घेते. पण आता संध्या पाटील या तरुणीनेही तिच्या डान्सने सर्वांना वेड लावले आहे. तिचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सध्या तिचा 'खुळखुळा' या मराठी गाण्यावरील डान्स प्रचंड व्हायरल होतोय. गौतमीला टक्कर द्यायला संध्या आली असल्याची चर्चा सध्या जोरात रंगली आहे.

Next Story
Share it