Janmarathi

प्रो. उडुपी रामचंद्र राव यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त गुगल चे आजचे डूडल.

10 मार्च 1932, कर्नाटकात जन्म " भारताचे सॅटेलाईट मॅन" म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्यांच्या सन्मानार्थ.

प्रो. उडुपी रामचंद्र राव यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त गुगल चे आजचे डूडल.
X

आज भारतीय वैज्ञानिक प्रोफ. उडुपी रामचंद्र राव यांची 89 वि जयंती असल्याकारणाने गुगलने डूडल प्रसिद्ध केले आहे. कर्नाटकाच्या एका गावात १० मार्च १९३२ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी भारतातील गुजरात विद्यापीठातून पी.एच.डी. प्राप्त केल्यानंतर अमेरिकेत डलास येथे वैश्विक किरण या भौतिकशास्त्रिय विषयाचे प्रोफेसर तसेच वैज्ञानिक म्हणून कार्य केले. त्यांनी भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक समजल्या जाणाऱ्या डॉक. विक्रम साराभाई याचे सहाय्यक म्हणून देखील काम केले आहे. त्यांनी अमेरिकेत नासा येथे प्रयोग देखील केले.

१९६६ मध्ये ते भारतात परतले तेव्हा त्यांनी 'फिजिकल रिसर्च लेबॉरेटरी' येथे काम केले. १९७२ मध्ये त्यांनी भारतीय सॅटेलाईट कार्यक्रमाचे प्रतिनिधीत्व केले. १९७५ मध्ये त्यांनी "आर्यभट्ट" हा भारतातील पहिला उपग्रह अवकाशात सोडण्याचे काम केले. त्यांनी २० महत्वपूर्ण उपग्रहांचा निर्माण केला ज्यामुळे ग्रामीण भारताच्या संदेशवहन व हवामान ई. क्षेत्रात प्रगाती झाली.

1984 ते १९९४ या काळात प्रोफ. राव यांनी आय.एस.आर.ओ. चे चेअरमन म्हणून कार्य केले. त्यांनी पी.एस.एल.व्ही. या रॉकेट तंत्रज्ञानाचा विकास केला ज्याच्या साहाय्याने २५० उपग्रह प्रक्षेपित केली गेली. २०१३ मध्ये ते 'सॅटेलाईट हॉल ऑफ फेम' या वाशिंग्टन येथील संस्थेत समावेश करण्यात आलेले पहिले भारतीय बनले. त्यांना पद्मविभूषण, युरी गागारीन इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आस्ट्रोनॉटिक्सचा थिओडोर व्हान करमान असे अनेक पुरस्कार प्राप्त होते.

Next Story