पावसाचे अंदाज कसे काढतात...........!

पावसाचे अंदाज कसे काढतात...........!
निसर्गाची किमया अगाध आहे. ती समजुन घ्यायला विज्ञानाचे निष्कर्ष पण कमी पडतात आणि हे निष्कर्ष बरोबर माहिती देऊ शकत नाही. आपले पूर्वज हाजारो वर्षा पासून प्राणी, पक्षी, कीटक आणि झाडे, सूर्य, चंद्र यांच्या परिस्थितीजन्य बदलातून अभ्यास करून त्यावरुन केलेला अंदाज अचूक ठरत असतो.
आजही आपण थोडे बारकाईने निरीक्षण केल्यास झाडे, कीटक, पक्षी यांच्या बदलातून आपल्याला वातावरणीय अंदाज बांधता येतात. जर तुम्हाला निसर्गाचा बदल बघायचा असेल तर दर वर्षी ११ जुनला दुपारी सूर्याचे बारकाईने निरीक्षण करा. जर त्यावेळेस सुर्या भोवती कंकन दिसल्यास ते दुष्काळाचे संकेत आसतात. जर मावळतांना सूर्याच्या लाल छटा पडत असतील आणि ते आकाशात उघड्या डोळ्यांनी दिसत असतील तर त्या भागात पुढील दोन-तीन दिवसात पाऊस पडतो असे आपले पूर्वज भाकीत करत होते.
निसर्गातील काही वनस्पती देखील येणाऱ्या संकटा बदल संकेत देत असतात. जसे, आंब्याच्या झाडाबद्दल आपल्या पूर्वजानी खुप महत्वाचे भाकीत केले आहे. ज्या वर्षी गावरान आंब्याला जास्त आंबे लागतात आणि लोक जास्त आंबा रस सेवन करतात, त्यावर्षी त्या भागात मोठा दुष्काळ पडतो. असा अनुभव मराठवाड्यातील लोकांनी २०१५,१६,१७ या तीन वर्षी अनुभवला आहे. मराठवाड्यात या तिनी वर्षी आंबे उत्पादन खूप झाले होते. तसेच ज्या वर्षी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी आब्यांचा मोहर झडला जातो, हे चांगल्या पाऊस काळाचे संकेत असतात.
पक्ष्या मध्ये कावळा हा पक्षी पावसाबद्दल किवां येणाऱ्या संकटा बदल जाणकार आहे. जर कावळ्याने पिंपळ झाडावर शेंड्याला घरटे बांधल्यास ते दुष्काळाचे संकेत असतात. जर हेच घरटे कावळ्याने झाडाच्या मध्यभागी दाट पानात बांधले तर, त्या वर्षी खुप पाऊस पडतो. चिमणी हा पक्षी देखील पर्जन्यमानाचे संकेत देतात. जर चिमणी एखाद्या फफाट्यात बसुन आपल्या अंगावर माती उडवून घेत असेल तर, त्या वर्षी चांगल्या पाऊसाचे संकेत असतात.
मे महिन्याचे सुरवातीच्या दहा दिवसा दरम्यान जर वादळी वारे सुटले असेल, तर त्या नंतर बरोबर एक महिन्याने मान्सूनचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या शेवटी जर पावश्या पक्षी 'पेरते व्हा' असा ओरडत असेल, तर तेव्हापासून १० ते १५ दिवसात पाऊस पडतो.
जुनच्या सुरवातीला सरडा दिसल्यास त्याच्या डोक्यावरील भागाचे बारकाईने निरीक्षण करा, जर तो भाग लाल रंगाचा असेल तर ते चांगल्या पावसाचे संकेत असतात. काही निरीक्षणे तर खरेच आश्चर्य चकित करणारी आहेत , काही गावात सकाळी ४ वाजता काकडा भजन होतात. जर दोन की.मी. अंतरावर पहाटे काकडा भजन चालत असले आणि त्या भजनाचा आवाज येत नसेल तर पुढील चार दिवस पाऊस पडणार नाही. जर दोन की.मी. वर चालल्या काकडा भजनाचा आवाज येत असेल तर, पुढील चार दिवसात येणाऱ्या पावसाचे ते संकेत असतात. कारण बाष्पाणे भरलेले ढग आवाजाला वरती जाऊ न देता, पाण्याच्या तरंगाप्रमाने चौफेर पसरवीतात. हेच कारण आहे कि, हिवाळ्यात सुद्धा अशी दूरवरची भजने पहाटे ऐकु येतात.
निसर्गातली वनस्पती पण पावसाच्या प्रमाणाबद्दल आणि पाऊसकाळा बदल अचूक संकेत देतात. त्यात बहावा हा महत्त्वाचा वृक्ष मानला जातो. बहावाच्या झाडांनी फुलायला सुरवात केली की, चार महिन्यांच्या आत पाऊस पडायला सुरवात होते.चिंचेच्या झाडांना फुलोरा जास्त आला तर पाऊस अधिक पडतो आणि कमी आला तर पाऊस कमी पडतो. जास्त पावसामुळे फुलं आणि कोवळी फळं गळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे चिंचेच्या झाडाने ही केलेली सोय असावी. बिबा, खैर आणि शमीची झाडं जास्तच फुलली की कमी पाऊस पडतो. या झाडांना पाणी कमी मिळाल्यामुळे त्यांच्या फुलांची गळ जास्त होते. वरील प्रमाणे अशी अजुन निरीक्षणे हे हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यास खुप प्रभावी ठरतात.