Janmarathi

आईच्या दुधाला अमृतुल्य का मानले जाते ही आहेत करणं 

let's have look at pro's and cons of brest milk ; WHO च्या माहितीनुसार हे आहेत स्तनपानाचे फायदे आणि तोटे

आईच्या दुधाला अमृतुल्य का मानले जाते ही आहेत करणं 
X
नवजात मुलाचे यामुळे होतात होतात मुत्यू कारण आहे अतिशय धक्कादायक
हल्लीच्या स्त्रिया बाळाला स्तनपान करण्यास टाळाटाळ करतात आणि खूप कमी काळ आपलं दूध बाळाला पाजतात ज्यामुळे भविष्यात बाळाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. असे होऊ नये म्हणून WHO ने जाहीर काही माहिती प्रसिद्ध केली आहे. स्तनपान हे बाळाला आणि आईला कशा प्रकारे फायदेशीर असते तसे न केल्यास होणारे तोटे देखील नमूद केले आहेत. स्तनपानात हयगय केल्यास आई व बाळाला भोगावे लागतात गंभीर परिणाम.
  • स्तनपानाविषयी काय म्हणतं WHO!
जन्मानंतर पहिल्या तासातच करावे स्तनपान करावे. आईने आपल्या बाळाला यशस्वीरित्या स्तनपान करण्यासाठी प्रत्येक प्रकारे सहकार्य केले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) शिफारशीनुसार बाळाला जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करावे. बाळाला पहिले सहा महिने सतत स्तनपान दिले पाहिजे. त्यानंतर वरच्या आहारासोबतच दोन वर्षे स्तनपान केले पाहिजे.
  • म्हणून भारतात होतो नवजात बाळांचा मृत्यू
आईने बाळाला स्तनपान दिले तर आई आणि बाळ दोघांनाही फायदा होतो. आईच्या दुधामुळे मुलाचा संपूर्ण शारीरिक आणि मानसिक विकास होतो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. बाळांना संसर्ग, न्यूमोनिया आणि अतिसारसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी असते. भविष्यात लठ्ठपणा, रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या आजारांना बळी पडण्यापासून मुलाला वाचवता येऊ शकते. मात्र आज भारतात स्तनपानाची स्थिती फारशी समाधानकारक नाही. एका अधिकृत अहवालानुसार, आज भारतातील फक्त ५४.९ टक्के माताच सहा महिन्यांपर्यंत स्तनपान देण्यास सक्षम आहेत. याचा परिणाम म्हणून आज भारतातील बालमृत्यूचे प्रमाण सुमारे २९ टक्के इतके आहे. जन्मानंतर सहा महिन्यांपर्यंत नवजात बाळाला स्तनपान देण्यामुळे २० टक्के नवजातांचा मृत्यूपासून बचाव होतो.
  • गर्भावस्थेतच जाणून घ्यावी स्तनपानाविषयी योग्य माहिती
अजूनही भारतातील अनेक माता स्तनपान देण्यास असमर्थ आहेत, कारण याबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. आईला स्तनपानाशी संबंधित समस्या असल्यास ती वेळेवर सोडवली जात नाही. वरील दूध किंवा कॅनचे दूध सहज उपलब्ध असणे आणि आरोग्य संस्थांमध्ये त्याचा अधिक प्रमाणात वापर करणे, हेही एक त्याचे कारण आहे. प्रत्येक मातेने गर्भधारणेदरम्यान स्तनपान करवण्याविषयी संपूर्ण माहिती घ्यावी. ज्या अंतर्गत: आईच्या स्तनाची तपासणी, आई व बाळाला स्तनपान देण्याचे फायदे, दूध कसे तयार होते, केव्हा येते, केव्हा ते पिणे फार महत्त्वाचे असते, ती दूध पाजू शकत नसेल तर दूध संकलित कसे करावे आणि कसे साठवावे, स्तनपानाशी संबंधित काही समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी काय केले पाहिजे, याबद्दल जाणून घेतले पाहिजे.
  • जन्मानंतर लगेच बाळासोबत चुकूनही करू नका या गोष्टी

१. जन्मानंतर लगेच अर्ध्या ते एक तासाच्या आत बाळाला स्तनपान दिले पाहिजे. त्यावेळी बाळ अधिक सतर्क असते.
२. जन्मानंतर बाळाला वरचे दूध, पाणी, मध किंवा इतर कोणत्याही प्रकारची औषधे आणि द्रवपदार्थ देऊ नये.
३. बाळाला दिवसातून आठ ते बारावेळा स्तनपान द्यावे याशिवाय त्याला पाहिजे तेव्हा स्तनपान द्यावे. मुलाला नेहमी आईबरोबर ठेवले पाहिजे.
४. आई नेहमी शांत आणि आनंदी असली पाहिजे. बाळाला इस्पितळात दाखल केले असेल किंवा कोणत्याही कारणास्तव दूध पीत नसेल तर अशा परिस्थितीत आईने तिचे दूध साठवून मुलाला पाजावे.
५. अन्यथा दूध येणे बंद होईल.जन्मानंतर जर या गोष्टी दिसत असतील तर बाळ व स्तनपान नॉर्मल आहेबाळ आठ ते दहावेळा आईचे दूध पीत असेल आणि दूध प्यायल्यानंतर दोन ते तीन तास झोपत असेल, २४ तासात सहा ते आठवेळा लघवी होत असेल आणि दहा दिवसांनंतर बाळाचे वजन दररोज २० ते २५ ग्रॅम असेल, तर बाळासाठी आईचे दूध पुरेसे आहे, हे समजून घ्यावे.
६. स्तनपानात अडथळे येऊ नयेत म्हणून आईने घ्यावी ही काळजीआईला विविध प्रकारचे अन्नपदार्थ आणि संतुलित आहार दिला पाहिजे.
७. ज्यामुळे आईच्या दुधात वाढ होण्याचे प्रमाण वाढेल आणि पोषक घटकांची पातळीही सुनिश्चित होईल. बाळ दूध पीत नसेल किंवा आईला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली असेल तर, आरोग्य सेवांची त्वरित मदत घ्यावी. अमृतपानात हयगय होणार नाही याची काळजी घ्यावी.
Next Story