Anda Biryani Recipe In Marathi ; घरगुती पार्टीसाठी चविष्ट आणि रुचकर अंडा बिर्याणी
Anda Biryani Recipe In Marathi ; चिकन किंवा मटण बिर्याणी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय टेस्टी ही अंडा बिर्याणी. घरगुती पार्टीसाठी चविष्ट आणि रुचकर असा अंडा बिर्याणीचा उत्तम पर्याय.

X
Anda Biryani Recipe In Marathi ; घरगुती पार्टीसाठी चविष्ट आणि रुचकर अंडा बिर्याणी
Shreekala Abhinave21 Oct 2021 6:06 AM GMT
Anda Biryani Recipe In Marathi ; घरगुती पार्टीसाठी चविष्ट आणि रुचकर अंडा बिर्याणी
Anda Biryani Recipe In Marathi ; संडे स्पेशल मेनू हॉटेल सारखी अंडा बिर्याणी
Anda Biryani Recipe In Marathi ; अशी करा स्वादिष्ट बिर्याणी घरच्या घरी
साहित्य : (Anda Biryani Recipe In Marathi)
- 4 चमचे तेल
- 6 कांदे उभे कापलेले
- 3 कप बासमती तांदूळ भिजवलेले
- 6 अंडी उकडलेले
- 2 बटाटे उकडलेले
- 1/2 टीस्पून हल्दी पावडर
- चवीनुसार मीठ
- पाणी
- 2 चमचे तेल 2 चमचे तूप
- 1 तमालपत्र
- 1 स्टार अॅनिस
- 1 इंच दालचिनी काठी
- 5-6 काळी मिरी
- 4-5 लवंगा
- 1 टीस्पून आले पेस्ट
- 1 चमचा लसूण पेस्ट
- 3 हिरव्या मिरच्या
- 1 चमचा लाल तिखट
- 1 चमचा हळद पावडर
- 1 ¼ टीस्पून गरम मसाला
- 2 टोमॅटो चिरलेले
- 3/4 कप दही
- 2 चमचे पुदिन्याची पाने
- 2 चमचे कोथिंबीर पाने
- 1 चमचा तूप
- 6 कप पाणी
कृती : (Anda Biryani Recipe In Marathi)
- सर्व प्रथम एका पातेल्यात 3 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून ठेवा आणि अंडा बिर्याणी मसाल्याला सुरुवात करा.
- एक खोलगट भांड्यात 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्या.
- त्यात 3 उभे चिरून घेललेले कांदे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तपकिरी रंगावर तळून बाजूला ठेवा.
- उकडलेली 6 अंडी आणि 2 बटाटे यांना फॉकने टोचवून घ्या.
- टोचवलेल्या बटाटे आणि अंड्यांवर हळद, मीठ आणि तिखट घाला कांदा फ्राय बाजूला करून घेतलेल्या कढईत उरलेल्या तेलात 1 मिनिटासाठी टाळून घ्या ज्यामुळे मसाला अंडी आणि बटाट्याच्या आतपर्यंत जाईल.
- हे बटाटे अंडी देखील बाजूला काढून ठेवा.
- त्याच भांड्यात 2 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून तूप गरम करा.
- त्यात साहित्यात दिलेल्या प्रमाणानुसार तमालपत्र, बडीशेप, दालचिनी, काळी मिरी घाला हा खडा मसाला काही सेकंद परतवा.
- त्यात 3 कांदे उभे चिरून घाला आणि त्यांना सोनेरी रंग मिळेपर्यंत छान परतवा.
- हिरवी मिरची आले लसूण पेस्ट 2 टेबलस्पून घाला आणि कच्चा वास निघून जाईपर्यंत परतवा.
- हा मसाला शिजून एकजीव झाल्यावर तिखट, हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला दिलेल्या प्रमाणाप्रमाणे घाला.
- 2 टोमॅटो बारीक चिरून घाला तसेच 3 टेबलस्पून दही घाला.
- या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.
- त्यात पुदिना आणि कोथींबीर चिरून घाला.
- चवीनुसार मीठ, बाजूला ठेवलेले बटाटे, अंडी, तांदूळ घालून चांगले मिक्स करावे.
- थोडा पुदिना आणि कोथिंबीर घाला.
- तांदुळाच्या दुप्पट म्हणजे 6 कप पाणी घाला आणि झाकण झाकून मध्यम आचेवर 15 मिनिटे शिजू द्या.
- भात शिजल्यानंतर तळलेला कांदे, 2 टीस्पून साजूक तूप, कोथिंबीर घाला.
- पुढील 5 मिनिटे दम वर (स्टीम) शिजवा. आपली चविष्ट आणि रुचकर अंडा बिर्याणी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
हे पण वाचा
Next Story