Anda Curry Recipe In Marathi ; नॉनव्हेज खाण्याची आठवण झाली तर लगेच अशी करा अंडा करी घरचे होतील खुश
Anda Curry Recipe In Marathi ; झणझणीत अंडा रस्सा संडे स्पेशल लंचसाठी, झटपट आणि चविष्ट अंडा करी

X
Anda Curry Recipe In Marathi ; नॉनव्हेज खाण्याची आठवण झाली तर लगेच अशी करा अंडा करी घरचे होतील खुश
Shreekala Abhinave24 Nov 2021 11:15 AM GMT
Anda Curry Recipe In Marathi ; झणझणीत अंडा रस्सा संडे स्पेशल लंचसाठी
Anda Curry Recipe In Marathi ; नॉनव्हेज खाण्याची आठवण झाली तर लगेच अशी करा अंडा करी घरचे होतील खुश
Anda Curry Recipe In Marathi ; झटपट आणि चविष्ट अंडा करी
अंडा करी साहित्य (Anda Curry Recipe In Marathi)
- 4-5 उकडवून घेतलेली अंडी
- 1 उकडलेला बटाटा
- 2 टोमॅटो मध्यम आकाराचे
- 2 कांदे उभे चिरलेले
- 3-4 हिरव्या मिरच्या वाटणासाठी
- मूठभर कोथिंबीर वाटणासाठी
- भाजलेलं सुकं खोबरं १ वाटी
- 2 टेबलस्पून आले लसूण पेस्ट
- गरम मसाला तमालपत्र, 1 मोठी वेलची, मिरे 3, लवंग 3
- तेल 2 टेबलस्पून
- लाल तिखट 3-4
- 1 टीस्पून हळद
- चवीनुसार मीठ
अंडा करीची कृती (Anda Curry Recipe In Marathi)
- एका मोठ्या कढईत तेल घालून चांगले गरम करून घ्या.
- तेल गरम झाल्यावर त्यात खडा गरम मसाला घाला तो तडतडल्यावर त्यात उभा चिरलेला कांदा घाला.
- कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यावा. हिरवी मिर्ची, कोथिंबीर आणि भाजलेलं खोबरं याचं वाटण करून घ्या.
- कांदा परतत आल्यावर त्यात घरगुती लाल मसाला आणि हळद घाला. पावडर मसाले परतून झाल्यावर त्यात टोमॅटो टाका आणि तो नरम करून घ्या.
- या मसाल्यात तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण दोन मोठे चमचे घाला. वाटण एकजीव करून त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्या.
- परतलेल्या वाटणात पाणी घाला. कढईवर झाकण ठेवल्याने वाटण खालून करपणार नाही. गॅस मंद आचेवर ठेवा.
- झाकण उघडून मिश्रण एकजीव करून घ्या. गरजेपुरता रस्सा तयार झाल्यावर त्यात उकडलेली अंडी आणि बटाटा घाला.
- पुन्हा मिश्रण चांगले एकजीव करावे. साधारण 10 मिनिटे कढई झाकून मोठी उकळी काढा 10 मिनिटांनी गॅस बंद करा.
- गरमागरम अंड्याचा रस्सा एका वाटीत काढून सर्व्ह करा. झणझणीत अंड्याचा रस्सा तयार.
हे पण वाचा
Kothimbir Vaadi Chi Recipe In Marathi
Next Story