Basundi Recipe In Marathi ; सणावाराला बासुंदीचा बेत नक्की करा हलवायापेक्षाही होईल चवदार
Basundi Recipe In Marathi ; खरपूस आणि खमंग बासुंदी करा झटपट अशा प्रकारे, दूध आटवण्याची सोपी पद्धत वापरा आणि आवर्जून बासुंदी करा

X
Basundi Recipe In Marathi ; सणावाराला बासुंदीचा बेत नक्की करा हलवायापेक्षाही होईल चवदार
Shreekala Abhinave27 Nov 2021 9:08 AM GMT
Basundi Recipe In Marathi ; खरपूस आणि खमंग बासुंदी करा झटपट अशा प्रकारे
Basundi Recipe In Marathi ; सणावाराला बासुंदीचा बेत नक्की करा हलवायापेक्षाही होईल चवदार
Basundi Recipe In Marathi ; दूध आटवण्याची सोपी पद्धत वापरा आणि आवर्जून बासुंदी करा
बासुंदी साठी साहित्य ; (Basundi Recipe In Marathi)
- फुलक्रीम दूध 2 लिटर
- साखर 3/4 कप
- बदाम 6-7
- काजू 6-7
- पिस्ता काप
- मखाने 10-12
- केशर
- वेलची पूड
बासुंदीची कृती ; (Basundi Recipe In Marathi)
- एक मोठे नॉनस्टिक पॅन किंवा कढई घ्या त्यात २ लिटर दूध ओता.
- दुधाला सर्वप्रथम मोठा गॅस करून उकळी आणून घ्या. गॅस मंद करून सर दोन मिनिटाने ढवळत रहा. साय जमून देऊ नका.
- प्रमाणात घेतलेले सुके मेवा तव्यावर गरम करून घ्या त्यात साजूक तुपाची गरज नाही.
- गरम केलेला सुका मेवा मिक्सर मध्ये रवाळ वाटून घ्या. त्यात साधे दूध घालून मिक्सरमधून पेस्ट करून घ्या.
- केसरीच्या 7 ते 10 काड्या एका वाटीत घेऊन त्यामध्ये उकळत असलेले दूध घाला आणि रंगासाठी केसर दूध तयार करून घ्या.
- मंद आचेवर उकळत असलेले दूध 3/4 होत आले कि त्यात साखर 3/4 कप घाला. साखर वितळेल तेव्हा दूध पातळ झाल्यासारखे वाटेल त्यामुळे गॅस फास्ट करू नये.
- त्यात तयार केलेली पेस्ट, केशर दूध घाला. पाच मिनिटे बासुंदी घट्ट करून घ्या आणि गॅस बंद करा.
- त्यात हवे असल्यास सुका मेव्याचे काप घालू शकता. बांसुदी पूर्णपणे थंड झाल्यावर फ्रिज मध्ये ठेवा
हे पण वाचा (Basundi Recipe In Marathi)
Gobi Manchurian Recipe In marathi
Paneer Biryani Recipe In Marathi
Next Story