Besan Barfi Recipe In Marathi ; दाणेदार रवाळ तोडांत विरघळणारी स्वादिष्ट बेसन बर्फी करा कोणत्याही समारंभासाठी
Besan Barfi Recipe In Marathi ; हलवयापेक्षा ही स्वादिष्ट आणि अप्रतिम बेसन बर्फी मिठाई, कोणत्याही सणासाठी बनवा घरगुती मिठाई मोजक्या सामानात

X
Besan Barfi Recipe In Marathi ; दाणेदार रवाळ तोडांत विरघळणारी स्वादिष्ट बेसन बर्फी करा कोणत्याही समारंभासाठी
Shreekala Abhinave17 Nov 2021 2:32 PM GMT
Besan Barfi Recipe In Marathi ; हलवयापेक्षा ही स्वादिष्ट आणि अप्रतिम बेसन बर्फी मिठाई
Besan Barfi Recipe In Marathi ; दाणेदार रवाळ तोडांत विरघळणारी स्वादिष्ट बेसन बर्फी करा कोणत्याही समारंभासाठी

बेसन बर्फीचे साहित्य (Besan Barfi Recipe In Marathi)
- बेसन 400 ग्रॅम
- साजूक तूप 250 ग्रॅम
- साखर 320 ग्रॅम
- मावा 200 ग्रॅम
- वेलची पावडर 1 टीस्पून
- केसर रंग चिमूटभर
- कापलेले पिस्ता बदाम 3-4 टेबलस्पून
- चांदीचा वर्ख सजावटीसाठी
बेसन बर्फी बनविण्याची कृती (Besan Barfi Recipe In Marathi)
- एका जाड बुडाची कढई घ्या. त्यात २५० ग्रॅम साजूक तूप घ्या.
- तूप चांगले गरम झाल्यावर त्यात दाणेदार बेसन घाला.
- बेसन बाहेरचे असेल तर घरातील चणाडाळ काहीशी बाजून रवाळ वाटून घ्या आणि बेसन पीठात मिसळा.
- मध्यम आचेवर हे ४०० ग्रॅम पीठ तुपात भाजून घ्या.
- एक दुसऱ्या पातेल्यात ८०० ग्रॅम साखरेचा दोन तारी पाक करून घ्या.
- पीठ गॅस मंद आचेवर भाजा नाही तर पीठ करपून जाईल.
- पाक करत असताना त्यात केसर रंग घाला ज्यामुळे पाकाला रंग मिळेल.
- सतत हलवत राहिल्याने पीठ ढिले होईल.
- अशा पिठात २०० ग्रॅम मावा घाला. पाच मिनिटे मावा भाजून घ्या.
- या मिश्रणात कापलेले पिस्ता बदाम टाका. गॅस बंद करा आणि सारखरेचा पाक पिठात ओता.
- मिश्रण मिक्स करून घ्या. एका ट्रेच्या तळाला तूप लावून घ्या.
- त्यात मिश्रण घाला आणि थंड करायला ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्या.
हे पण वाचा
Kothimbir Paratha Recipe In Marathi
Next Story