Bharli Vangi Recipe In Marathi ; चमचमीत स्टफ वांगी करण्याची सोपी पद्धत
Bharli Vangi Recipe In Marathi ; गावरान टेस्ट असलेली भरलेली वांगी करा कधीही, झटपट फस्त होणारी भरली वांगी

X
Bharli Vangi Recipe In Marathi ; चमचमीत स्टफ वांगी करण्याची सोपी पद्धत
Shreekala Abhinave11 Dec 2021 2:30 PM GMT
Bharli Vangi Recipe In Marathi ; गावरान टेस्ट असलेली भरलेली वांगी करा कधीही
Bharli Vangi Recipe In Marathi ; चमचमीत स्टफ वांगी करण्याची सोपी पद्धत
Bharli Vangi Recipe In Marathi ; झटपट फस्त होणारी भरली वांगी
भरलेली वांगी करण्याचे साहित्य (Bharli Vangi Recipe In Marathi)
- वांगी 7
- किसलेले सुके खोबरे 2 टेबलस्पून
- भाजलेले शेंगदाणे 2 टेबलस्पून
- भाजलेला कांदा १ टीस्पून
- हळद पावडर 2 टीस्पून
- लाल मिरची पावडर 1 टीस्पून
- जिरे पावडर 1 टीस्पून
- धने पावडर 1 टीस्पून
- गरम मसाला पावडर
- 5 लसूण पाकळ्या
- मीठ
- तेल
भरलेली वांगी करण्याची कृती (Bharli Vangi Recipe In Marathi)
- साधारण 7 मध्यम आकाराची वांगी घेताना त्याला होल नाही याची काळजी घ्या.
- वांगी तुटणार नाही यापद्धतीने उभे आणि आडवे कट द्या.
- लगेचच ही वांगी मिठाच्या पाण्यात पूर्ण भिजतील अशी ठेवा.
- एका मोठा कांद्याला जोरात फटका मारून त्याला चिर द्या.
- हा फाटलेला कांडा गॅसवर ठेवा उलटून पालटून भाजून घ्या.
- बाजूला काढून थंड केल्यावर त्यावरील हलकेच निघत असलेले काळे वर्ख काढून टाका.
- त्यानंतर एका बाऊलमध्ये किसलेले सुके खोबरे 2 टेबलस्पून भाजून थंड करायला ठेवा.
- त्यात भाजलेले आणि कुटलेले शेंगदाणे 2 टेबलस्पून घ्या. त्यात हळद पावडर 2 टीस्पून, लाल मिरची पावडर 1 टीस्पून, जिरे पावडर 1 टीस्पून, धने पावडर 1 टीस्पून, गरम मसाला पावडर, 1 टीस्पून, 5 लसूण पाकळ्या आणि भाजलेला कांदा एकत्र करा.
- हे कोरडे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात वाटून काढा. वाटताना अतिशय थोडे पाणी घाला.
- चवीनुसार घट्ट असे वाटण करा. हे मिश्रण वांग्यामध्ये भरा.
- तव्यावर थोडे तेल घालून हलक्या हाताने भाजून घ्या. साधारण 10 मिनिटात वांगी शिजतात.
- थोडे लपथपी वांग हवं असेल तर कढईत झाकून वांगी शिजवून घ्या आणि अतिशय थोडे पाणी घालून वाफवून घ्या.
हे पण वाचा (Bharli Vangi Recipe In Marathi)
Next Story