Chicken Biryani Recipe In Marathi ; अशा प्रकारे चिकन बिर्याणी करा घरच्या घरी चव मिळेल रेस्ट्रॉरंटसारखी
Chicken Biryani Recipe In Marathi ; चिकन बिर्याणी घरगुती पार्टीसाठी दमदार मेनू, सोप्या पद्धतीने करा चिकन बिर्याणी फ्रेश आणि चविष्ट

X
Chicken Biryani Recipe In Marathi ; चिकन बिर्याणी घरगुती पार्टीसाठी दमदार मेनू
Shreekala Abhinave2 Nov 2021 12:49 PM GMT
Chicken Biryani Recipe In Marathi ; चिकन बिर्याणी घरगुती पार्टीसाठी दमदार मेनू
Chicken Biryani Recipe In Marathi ; अशा प्रकारे चिकन बिर्याणी करा घरच्या घरी चव मिळेल रेस्ट्रॉरंटसारखी
Chicken Biryani Recipe In Marathi ; सोप्या पद्धतीने करा चिकन बिर्याणी फ्रेश आणि चविष्ट
बिर्याणीसाठी साहित्य
- चिकन 1 किलो
- बिर्याणी तांदूळ 750 ग्रॅम
- कांदे 500 ग्रॅम
- ताजे दही 250 ग्रॅम
- कश्मीरी लाल मिरची पावडर
- हळद 1/2 टीस्पून
- हिरव्या मिरच्या 2-3
- कोथिंबीर 2 - 3 टेबलस्पून
- पुदीना 20-25 पाने
- मीठ चवीनुसार
- गरम मसाला पावडर 2 टेबलस्पून
- दालचीनी 3 इंच
- जिरे 1 टीस्पून
- लवंग 4-5
- हिरव्या वेलची 5
- आले लसुण पेस्ट 4 टीस्पून
- तळलेला कांदा
- तेल 1/2 कप
- केशर दूध 1/2 कप
बिर्याणी भात तयार करण्यासाठी
- बिर्याणी तांदूळ 750 ग्रॅम
- जिरे 1 टीस्पून
- दालचीनी 1
- चक्री फूल 1
- तमालपत्र 4
- मीठ चवीनुसार
- लिंबू रस 1 टेबलस्पून
- पुदीना पाने 10-12
- ताजी कोथिंबिर थर देण्यासाठी
- तूप 4 टीस्पून
- तळलेला कांदा
बिर्याणीसाठी कृती
- बिर्याणी कट केलेले 1 किलो चिकन एका मोठ्या जाड तळाच्या भांड्यात घ्या.
- शक्यतो याच भांड्यात बिर्याणीला दम देता येत असेल तर अधिक उत्तम.
- अर्धा किलो कांदा पातळ उभा चिरून घ्या.
- मोठ्या आचेवर तळून घ्या. तळताना गॅस मंद करू नका त्यामुळे कांदा मऊ पडतो आणि तेल शोषतो.
- कांदा तपकिरी रंगावर तळून घ्या.
- जाड बुडाच्या भांड्यात 1 किलो चिकन घ्या.
- त्यात ताजे दही 250 ग्रॅम, दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा लिंबू, 3 मिरच्या, प्रमाणानुसार दिलेला खडामसाला, आले लसूण पेस्ट 4 टीस्पून, कोथिंबीर - पुदिना पाने, 2 चमचे गरम मसाला, अर्धी वाटी केशर दूध, तळलेला कांदापैकी अर्धा चुरून चिकनच्या मॅरिनेशनमध्ये घाला आणि उरलेला थरांमध्ये घाला.
- तसेच मॅरिनेशन मध्ये 3 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून तूप घाला.
- शक्य असल्यास दोन तास आणि किंवा घाई असल्यास किमान पाऊणतास चिकन मसाल्यात मॅरीनेट करा.
बिर्याणी भात तयार करण्यासाठी कृती
- बिर्याणी तांदूळ दिलेल्या प्रमाणानुसार घ्या त्याला स्वच्छ धुवून पाणी टाकून अर्धा तास भिजवून घ्या.
- एका वेगळ्या भांड्यात कडक पाणी उकळवून घ्या.
- त्यात जिरे 1 टीस्पून, दालचीनी 1, चक्री फूल 1, तमालपत्र 4, मीठ चवीनुसार, लिंबू रस 1 टेबलस्पून, पुदीना पाने 10-12, ताजी कोथिंबीर, दोन मिरच्या, दोन चमचे तेल, अर्धा लिंबू पिळून घाला, पाणी खळखळ उकळल्यावर त्यात भिजवलेला भात घाला.
- गॅस मंद करू नये.भात 50 टक्के शिजल्यावर त्यातील अर्धा भात काढून चिकन मॅरीनेट केलेल्या टोपात घाला.
- उरलेला भात त्याच टोपात 70 टक्के शिजवून घ्या आणि चिकन मॅरीनेट केलेल्या टोपात घाला.
- त्यावर पुदीना पाने 10-12, ताजी कोथिंबीर, अर्धा कप केशर दूध, 4 मोठे चमचे तूप घाला.
- झाकण लावून कणकेने सील करून पहिली 5 मिनिटे मध्यम आचेवर गॅसवर आणि नंतर 30 ते 35 मिनिटे जाड तवा ठेवून त्यावर दम द्यावा.
- बिर्याणी झाल्यावर कणकेचे सील तोडून पाहावे. चविष्ट आणि दमदार बिर्याणी तयार आहे. कोणत्याही कोशिंबीर सोबत सर्व करा.
हे पण वाचा
Kothimbir Chi Vadi Recipe In Marathi
Next Story