Chicken Samosa Recipe In Marathi ; चिकन समोसा बनविण्यासाठी अशी करा पद्धत नक्की होईल हॉटेल सारखा
Chicken Samosa Recipe In Marathi , चिकन समोसा बनविण्यासाठी अशी करा पद्धत नक्की होईल हॉटेल सारखा, मुलांची देखील होईल फेव्हरेट डिश

X
Shreekala Abhinave7 Oct 2021 1:54 PM GMT
Chicken Samosa Recipe In Marathi ; चिकन समोसा बनविण्यासाठी अशी करा पद्धत नक्की होईल हॉटेल सारखा
chicken samosa recipe in marathi ; चिकन समोसा करा घरच्या घरी
- चिकन समोसा साठी साहित्य : (chicken samosa recipe in marathi)
चिकन मिन्स (कीमा)- 500 ग्रॅम
समोसा पट्टी (पफ पेस्ट्री शीट्स) सुमारे 20 (10 "x 3" आकार)
कांदा, बारीक चिरलेला- 2 मध्यम (150 ग्रॅम)
आले, बारीक चिरलेला- 2 टीस्पून
लसूण, बारीक चिरलेला- 2 टीस्पून
हिरव्या मिरच्या, बारीक चिरून- 2-3
कोथिंबीर, चिरलेली-
5-6 टेस्पून मसाला पावडर
हळद पावडर- 1/2 टीस्पून
लाल तिखट- 1 टीस्पून
काळी मिरी पावडर- 1 टीस्पून -
गरम मसाला पावडर- 1/2 टीस्पून
टोमॅटो सॉस- 2 टेस्पून
तेल- 3 टेस्पून
समोस्याचे कव्हर करण्यासाठी
१/१-२ कप मैदा
गरम केलेले ३ टेबलस्पून तेल (तेलाचे मोहन)
चवीनुसार मीठ
१ टीस्पून जिरे
- कृती (chicken samosa recipe in marathi)
एका कढईत २ टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा घाला कांदा सोनेरी रंगावर भाजून घ्या. त्यात २ टीस्पून ठेचलेलं आलं-लसूण घाला. त्यानंतर चिकनचा खिमा घाला आणि ३ ते ४ मिनिटे मोठ्या आचेवर परतवून घ्या. खिम्याला सुटलेले सर्व पाणी सुकवून घ्या. १ चमचा लाल तिखट, १ चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. २ टेबलस्पून टोमॅटो सॉस घाला. चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्या.
समोस्याचे आवरण करण्यासाठी १/१-२ कप मैदा घ्या. त्यात ३ टेबलस्पून गरम तेलाचे मोहन घाला. मोहन घातल्या ठिकाणी जिरे घाला. मोहन संपूर्ण पिठात मिक्स करा. पीठ थोडे थोडे पाणी घालून मळून घ्या. पिठाचे त्रिकोणी कोन करून त्यात थंड सारण भार आणि तळा.
समोस्याचे आवरण करायचे नसल्यास समोसा पट्टी (पफ पेस्ट्री शीट्स) सुमारे 20 (10 "x 3" आकार) बाजारातून आणू शकता
हे पण वाचा
Next Story