Janmarathi

Chivda Recipe In Marathi ; दिवाळी नंतरही खा चविष्ट आणि कुरकुरीत पोहा चिवडा

Chivda Recipe In Marathi ; पोट भरले तरी मन भरणार नाही असा चटपटी पोहा चिवडा सोपा आणि स्वादिष्ट, दिवाळी नंतरही खा चविष्ट आणि कुरकुरीत पोहा चिवडा

Chivda Recipe In Marathi
X

Chivda Recipe In Marathi ; दिवाळी नंतरही खा चविष्ट आणि कुरकुरीत पोहा चिवडा

Chivda Recipe In Marathi ; कुरकुरीत आणि खमंग पोहा चिवडा खाण्यासाठी मस्त

Chivda Recipe In Marathi ; दिवाळी नंतरही खा चविष्ट आणि कुरकुरीत पोहा चिवडा

Chivda Recipe In Marathi ; पोट भरले तरी मन भरणार नाही असा चटपटी पोहा चिवडा सोपा आणि स्वादिष्ट

पातळ पोहे चिवडाचे साहित्य

 • पातळ पोहे १/२ किलो
 • सुकं खोबरं १/२ वाटी
 • शेंगदाणे १/२ वाटी
 • डाळवं १/४ वाटी
 • कढीपत्ता १/२ वाटी
 • चिरलेली कोथिंबीर १/२ वाटी
 • हिरव्या मिरच्या ७/८( चवीनुसार)
 • लसूण ७/८ पाकळ्या
 • फोडणीसाठी तीळ १ टेबलस्पून
 • जिरे मोहरी हिंग १/४ चमचा
 • हळद १/२ चमचा
 • धने जिरेपूड १ टीस्पून
 • काळं मीठ १ टीस्पून
 • चाट मसाला १ टीस्पून
 • मीठ चवीनुसार
 • तेल


पोहे चिवड्याची कृती

 • गॅसवर एक मोठी खोलगट कढई घ्या.
 • त्यात २ टेबलस्पून तेल घ्या तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, मिरची, कढीपत्ता कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या.
 • खोबरे शेंगदाणे सुद्धा तांबूस रंगावर परतावा.
 • त्यात डाळवं, तीळ आणि शेवटी हिंग आणि हळद घाला.
 • फोडणीचे सर्व जिन्नस प्रमाणानुसार घाला.
 • झालेल्या फोडणीत पातळ पोहे घाला आणि गॅस बंद करा.
 • दोन मोठ्या चमच्याने पोहे वर खाली चांगले फोडणीत मिक्स करून घ्या.
 • गॅस पुन्हा सुरु करून मंद आचेवर धने जिरेपूड १ टीस्पून, काळं मीठ १ टीस्पून, चाट मसाला १ टीस्पून मीठ चवीनुसार घालून थोडंसं परतावा आणि चिवडा थंड करून हवा बंद डब्यात भरून ठेवा.
 • महिनाभर टिकून राहणारा हा चिवडा आहे.


हे पण वाचा

Rava Besan Ladoo Recipe In Marathi

Besan Ladoo Recipe In Marathi


Next Story