Chocolate Cake Recipe In Marathi ; चॉकलेट केक सोपा आणि अतिशय चविष्ट
Chocolate Cake Recipe In Marathi ; बाजरातील केक देखील पडतील फिके या केक समोर, ओव्हन शिवाय देखील उत्तम होणारा चॉकलेट केक

X
Shreekala Abhinave6 Dec 2021 8:33 AM GMT
Chocolate Cake Recipe In Marathi ; बाजरातील केक देखील पडतील फिके या केक समोर
Chocolate Cake Recipe In Marathi ; चॉकलेट केक सोपा आणि अतिशय चविष्ट

Chocolate Cake Recipe In Marathi ; ओव्हन शिवाय देखील उत्तम होणारा चॉकलेट केक
चॉकलेट केकचे साहित्य (Chocolate Cake Recipe In Marathi)
- 3/4 कप कोमट दूध
- 1/4 कप तेल
- 3/4 कप पिठी साखर
- 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
- 1 टीस्पून व्हिनेगर
- 1 1/4 कप मैदा
- 1/4 कप कोको पावडर
- 1 टीस्पून बेकिंग पावडर
- 1/4 टीस्पून बेकिंग सोडा
- 325 ग्रॅम डार्क कंपाउंड चॉकलेट
- 200 मिली अमूल फ्रेश क्रीम / मलाई
- 1/2 कप पाणी
- 2 चमचे पिठी साखर
- 4-5 थेंब व्हॅनिला इसेन्स
चॉकलेट केकची कृती (Chocolate Cake Recipe In Marathi)
- एका मिक्सिंग बाऊलमध्ये पाऊण कप कोमट दूध घ्या. त्यात पाव कप तेल, पिठी साखर, व्हॅनिला इसेंस, व्हिनेगर प्रमाणानुसार घाला आणि चांगले ढवळून घ्या.
- दहा मिनिटे बाजूला ठेवा. एका दुसऱ्या बाऊलमध्ये 1 1/4 कप मैदा, 1/4 कप कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालून मिश्रण चाळून घ्या आणि चांगले एकजीव करून घ्या.
- बेकिंग सोडा आणि पावडर नसल्यास इनो एक सॅशे घातला तरी चालतो.
- केक टीनला बटरने ग्रीस करून त्यात मिश्रण ओता. केक टिन टॅप करून घ्या त्यातील हवा निघून जाईल.
- कुकर मध्ये तळाला स्टॅन्ड ठेवा त्यावर एक स्टीलची प्लेट ठेवा आणि त्यावर केक टिन प्लेस करा.
- कुकरच्या झाकणाची शिटी काढून साधारण 45 मिनिटे केक बेक करून घ्या.
- मधल्या वेळेत केक वर टाकण्यासाठी चॉकलेट गनाश बनवून घ्या.
- त्यासाठी 325 ग्रॅम डार्क कंपाउंड चॉकलेट, 200 मिली अमूल फ्रेश क्रीम, 4-5 थेंब व्हॅनिला इसेन्स आणि एक क्यूब बटर घाला आणि डबल बॉईल करून हे मिश्रण वितळवून घ्या.
- बटरने गनाशला उत्तम चकाकी येईल. तयार झालेल्या गनाश पैकी पाव वाटी गनाश बाजूला काढा आणि उरलेले फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
- केक पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचे 3 भाग करून घ्या प्रत्येक भागावर साखर साध्या पाण्यात वितळवून तयार केलेले साखरपाणी घाला आणि घट्ट झालेले गनाश पसरवा.
- पूर्ण झालेल्या केकवर बाजूला काढलेले गनाश टाकून सजवा. चॉकलेट ट्रफल केक रेडी आहे.
हे पण वाचा (Chocolate Cake Recipe In Marathi)
Next Story