Gulab Jamun Recipe In Marathi ; गुलाबजाम मिक्स बनेल या तीन पदार्थापासून नक्की ट्राय करा
Gulab Jamun Recipe In Marathi ; रसरशीत आणि मऊ मुलाबजाम तोंडात विरघळतील असे,अतिशय सोप्या पद्धतीने बनवा गुलाबजाम घरच्या घरी

X
Gulab Jamun Recipe In Marathi ; गुलाबजाम मिक्स बनेल या तीन पदार्थापासून नक्की ट्राय करा
Shreekala Abhinave9 Dec 2021 10:51 AM GMT
Gulab Jamun Recipe In Marathi ; रसरशीत आणि मऊ मुलाबजाम तोंडात विरघळतील असे
Gulab Jamun Recipe In Marathi ; गुलाबजाम मिक्स बनेल या तीन पदार्थापासून नक्की ट्राय करा
Gulab Jamun Recipe In Marathi ; अतिशय सोप्या पद्धतीने बनवा गुलाबजाम घरच्या घरी
गुलाबजाम करण्याचे साहित्य (Gulab Jamun Recipe In Marathi)
- 9 टेबलस्पून मिल्क पावडर
- 3 ½ टेबलस्पून मैदा
- 1 ½ टीस्पून रवा,
- 1 टीस्पून पेक्षा कमी बेकिंग सोडा
- 2 कप पाणी
- 2 कप साखर
- 2 चमचे दूध
- 2 चमचे दही
- 1 टीस्पून तूप
गुलाबजाम करण्याची कृती (Gulab Jamun Recipe In Marathi)
- सर्वप्रथम एक मोठ्या पातेल्यात साखरेची चासनी करून घेण्यासाठी प्रमाणात दिल्या प्रमाणे साखर आणि पाणी एकत्र करून पाक तयार करून घ्या. पाक अधिक घट्ट करू नका.
- गुलाबजाम करण्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये भांड्यात दुधाची पावडर, मैदा, रवा, बेकिंग सोडा, दही, दूध प्रमाणानुसार घालून मिक्स करून घ्या.
- मऊ पिठाचा गोळा बनवून घ्या. पिठाचे लहान गोळे करून घ्या. त्याला चीर जाणार नाही याची काळजी घ्या.
- सोबतच कढईत तूप किंवा तेल गरम करा, तूप / तेलाचे तापमान तपासण्यासाठी पीठाची गोळी कढईत टाकून पहा.
- गोळी चटकन वर आली म्हणजे गुलाबजाम तळण्यासाठी सज्ज आहेत.
- मध्यम ते मंद आचेवर तळून घ्या. गुलाबजाम तपकिरी रंगावर येईपर्यंत तळा.
- हलक्या हाताने ढवळत राहा जेणेकरून ते सर्व बाजूंनी तळून निघतील.
- ते बाहेर काढून 2 मिनिटे बाजूला ठेवा आणि पाकात सोडा.
- गरम गुलाबजाम पाकात सोडल्यास फुटतील. किमान 1 तास पाकात ते मुरू द्यावेत.
- गुलाबजाम पूर्ण मुरल्यावर एका बाउलमध्ये सर्व्ह करा, त्यावर सिल्व्हर वर्क, गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ते कापून सजवा.
हे पण वाचा (Gulab Jamun Recipe In Marathi)
Soyabean Biryani Recipe In Marathi
Dal Bati Recipe In Marathi
Cup Cake Recipe In Marathi
Next Story