Hyderabadi Chicken Biryani Recipe In Marathi Language ; छोटेखानी पार्टीसाठी उत्तम पर्याय हैद्राबादी चिकन बिर्याणी
Hyderabadi Chicken Biryani Recipe In Marathi Language ;

X
Shreekala Abhinave24 Nov 2021 8:24 AM GMT
Hyderabadi Chicken Biryani Recipe In Marathi Language ; चविष्ट आणि दमदार हैद्राबादी चिकन बिर्याणी करा घरच्या घरी
Hyderabadi Chicken Biryani Recipe In Marathi Language ; छोटेखानी पार्टीसाठी उत्तम पर्याय हैद्राबादी चिकन बिर्याणी
Hyderabadi Chicken Biryani Recipe In Marathi Language ; कोणत्याही रेस्ट्रॉरंटपेक्षा चवीत कमी नसणारी लुसलुशीत हैद्राबादी चिकन बिर्याणी
हैद्राबादी चिकन बिर्याणी साठी साहित्य (Hyderabadi Chicken Biryani Recipe In Marathi Language)
- 5 चमचे तूप
- 1 1/2 टीस्पून आले लसूण पेस्ट
- 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- 1 किलो चिकन
- 1 टीस्पून हळद पावडर
- 1 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर
- मीठ चवीनुसार
- 1 कप पाणी
- तळलेले कांदे 1 कप
- दही 1/4 कप
- 10 काजू आणि 1 टीस्पून खसखस पेस्ट
- 300 मिली नारळाचे दूध
- 1/4 कप पुदिन्याची पाने
- 1/4 कप चिरलेली कोथिंबीर
- 750 ग्रॅम तांदूळ
- 3 चमचे तूप
- 3 चमचे केशर दूध
हैद्राबादी चिकन बिर्याणीची कृती (Hyderabadi Chicken Biryani Recipe In Marathi Language)
- सर्वप्रथम कढईत 5 टेबलस्पून तूप गरम करा. गरम झालेल्या टोपात प्रत्येकी दीड टेबलस्पून आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला.
- आले-लसूण पेस्टचा कच्चा वास निघेपर्यंत ती परतून घ्या. टोपात धुवून स्वच्छ केलेले चिकन घाला.
- चिकन घातल्यावर ते सुमारे 3-4 मिनिटे मोठ्या आचेवर परतावे.
- त्यात हळद, तिखट, मीठ, पाणी दिलेल्या प्रमाणानुसार घाला.
- टोपावर झाकण ठेवून 7-8 मिनिटे शिजवून घ्या.
- चिकन शिजत येत असताना त्यात तळलेला 1 कप पेक्षा थोडा कमी कांदा घाला.
- उरलेला कांदा गार्निशिंग साठी राखून ठेवा.
- त्याचबरोबर भिजवलेले काजू आणि खसखस थोडे पाणी घालून रनिंग पेस्ट करून घ्या.
- बनविलेली ही पेस्ट, 300 मिली नारळाचे दूध आणि दही एकत्र करून चिकनमध्ये घाला.
- हलक्या हाताने मिक्स करून घ्या. चिकनवर झाकण ठेवू नका दूध फाटण्याची शक्यता असते.
- आच थोडीशी मंद करा करा आणि चिकन एकजीव करून घ्या.
- त्यात चिरलेली पुदिन्याची आणि कोथिंबीरची पाने घाला.
- गरम मसाला घाला. चिकन शिजेपर्यंत सुमारे 15 मिनिटे शिजू द्या.
- चिकन आणि भात 90 टक्के शिजल्यावर टोपात लेअरिंग करून घ्या.
- चिकनवर भात घाला आणि भातावर 3 चमचे तूप, केशर दूध, तळलेले कांदे, चिरलेली कोथिंबीर घाला आणि झाकून बिर्याणीला दम द्या.
- मंद आचेवर 15-20 मिनिटे शिजवून घ्यावे. अशी चविष्ट बिर्याणी रायता सोबत सर्व्ह करा
हे पण वाचा (Hyderabadi Chicken Biryani Recipe In Marathi Language)
Next Story