Janmarathi

Spongy and Tasty Dhokla recipe in Marathi ; जाळीदार आणि मऊसूत ढोकळा

Instant कमीत कमी घरात उपलब्ध असलेल्या सामानात करता येईल बेसन ढोकळा

Spongy and Tasty Dhokla recipe in Marathi ; जाळीदार आणि मऊसूत  ढोकळा
Xतुमचा ढोकळा फसत असेल तर करा अशी रेसिपी, पोट भरेल पण मन भरणार नाही


पचपचीत ढोकळा, बेचव ढोकळा किंवा बाजारातील इन्स्टंट पीठ आणून तयार केलेले ढोकळा देखील फसत असेल तर एकदा करा अशी पद्धत
  • साहित्य : 1 कप बेसन (चाळून घेतलेले), अर्धा कप दही त्यात अर्धा कप पाणी घालून पातळ केलेले ताक, मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा बेकिंग पावडर, 1 इनो सॅचेट, राई, मिरची, कढीपत्ते, दोन टेबलस्पून साखर, कढीपत्ता
  • कृती : एक खोलगट पातेल्यात किंवा बाऊलमध्ये 1 कप बेसन (चण्याचे पीठ) चाळून घ्या. त्यात अर्धाकप कप दही आणि अर्धा कप पाणी घालून तयार केलेले 1 कप ताक पिठात घाला. असे 1 कप बेसन आणि 1 कप घातलेले ताक घातलेले मिश्रण ढवळतांत एकच दिशेने ढवळाल याची काळजी घ्या. त्यात चावी नुसार मीठ आणि [पाव चमचा हळद घाला. मिश्रण कमीत कमी 15 मिनिटे आणि अधिकाधिक 1 तास झाकून ठेवा. इडली स्टॅण्ड अथवा केक टिनच्या तळाशी थोडेसे तेल लावा. मिश्रण भांड्यात ओतण्या आधी पुन्हा एकदा एकाच दिशेने ढवळून घ्या. त्यात पाव चमचा बेकिंग पावडर आणि एक इनोचा सॅचेट टाकून एकाच दिशेने ढवळा. उकळत्या पाण्यात भांडे ठेवून मिश्रण भाड्यात टाका. गॅस काहीसा मोठा करून १५ मिनिटे मिश्रण उकडून घ्या. वाफवून तयार झालेला ढोकळा डिमोल्ड करण्याची घाई न करता अर्धातास रम टेम्परेचर ला येण्याची वाट पहावी. बाजूला कढई ठेवून त्यात दोन च मचे तेल घालाराई घाला तीन मिरच्या, पाव चमचा त्यात 8 पाने कढीपत्ता टाका, पाव कप पाणी टाका, २ टेबल्स्पूल साखर टाका गरम फोडणी ढोकळ्यावर ओता. गरम गरम चविष्ट ढोकळा सर्व करायला तयार.
  • टीप - ढोकळा थोडासा आंबट हवा असेल तर फोडणीत 4 थेंब लिंबू रस टाका.

Next Story