Janmarathi

झटपट तयार होणारे हिरव्या मिरचीचे लोणचे जे रोजच्या जेवणाची चव वाढवेल.

आपण आज झटपट तयार होणारे मिरचीचे लोणचे पाहणार आहोत हे तुमच्या जेवणाची चव वाढवेल.

झटपट तयार होणारे हिरव्या मिरचीचे लोणचे जे रोजच्या जेवणाची चव वाढवेल.
X

भारतात, छप्पर, अंगण किंवा खिडकी ज्याद्वारे सूर्यप्रकाश येतो. तेथे उन्हात आपल्याला लोणचे मुरवण्यासाठी ठेवलेले दिसेल. ते शहर असो की गाव, उन्हाळ्यात लोणचे मुरत असताना दिसते. लोणचे मुरायला उन्हात ठेवल्याने चव वाढते. मग तो आवळा, चिंच, बेरी, कैरी, सफरचंद, टोमॅटो, सुकामेवा, आपण अनेक प्रकारच्या लोणचे ही उन्हात ठेवून मुरवू शकतो. तुम्ही तुमच्या जेवणात लोणचे नेहमी वापरता. महाराष्ट्रीयन एकही डिश ही लोणच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. चला आज एक तिखट आणि मसालेदार मिरची लोणचे बनवूया. हिरव्या मिरचीचे लोण हे भारतातील एक अतिशय लोकप्रिय लोणचे आहे, जे बरेच घरांत तयार केले जाते.

साहित्य : -

हिरवी मिरची १५० ग्रॅम

मोहरीचे तेल १०० मि.ली.

सुक्या आंब्याचा पावडर १.५ चमचा

बडीशेप बियाणे 3 चमचा

ओवा १ चमचा

राई २ चमचा

मेथीचे दाणे १ चमचा

जिरे १ चमचा

हळद १ चमचा

लाल तिखट १ चमचा

मीठ ३ चमचे किंवा चवीनुसार

कृती :-

  • प्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या नंतर त्याचे देठं काढून घ्या. मग सर्व मिरच्या एका स्वच्छ कापडाने पुसून घ्या. मिर चीवर अजिबात पाणी राहता कामा नये.
  • मिरच्या वाळवून झाले की त्याचे दोन भाग करून घ्या.
  • आता आपण मिरच्यांच्या लोणच्यासाठी चा मसाला तयार करणार आहोत मिक्सरच्या भांड्यात बडीशेप, ओवा, राई, जिर घ्या आणि कोरडा मसाला वाटून घ्या.
  • लोणचे बनवण्यासाठी तुम्हाला तिळाचे तेल वाफ येई पर्यंत गरम करून घ्यावे लागेल. त्यामुळे थोड्या वेळ तिळाचे तेल गरम करून घ्यावे.
  • एकामोठ्या भांड्यात आपण बनवलेला मसाला काढून घ्या.
  • त्यातसुक्या आंब्याची पावडर, लाल तिखट, हळद आणि मीठ घालावे आणि चांगले ढवळावे.
  • सगळे मसाले एकत्र करून झाले की मोहरीचं तेल टाका आणि सर्व चांगले मिक्स करून घ्या.
  • मसाला मिक्स करून झाले की त्यात चिरलेली मिरची घालून मिरची आणि मसाला एकत्र मिक्स करून घ्या.
  • मिरची आणि मसाले एकत्र झाल्यावर लोणचे एका काचेच्या भांड्यात भरा आणि त्याला एक घट्ट झाकण लावून कडक उन्हात दोन दिवस वाळवा.
  • दोन दिवसानंतर लोणचे खाण्यास तयार आहे.
  • हे लोणचे तुम्ही तयार कराल तेव्हाही खाऊ शकता, पण मग तुम्हाला मिरची आणि तेल एकत्र केल्यावर चार ते पाच मिनिटे उकळून घ्यावे लागेल.

हे मिरचीचे लोणचे तुम्ही पराठा, नान, थालीपीठ इत्यादी बरोबर सर्व्ह करू शकता.

Next Story