Kachori Recipe In Marathi ; मोजक्या टिप्स सह बनवा अशी कचोरी घरच्या घरी
Kachori Recipe In Marathi ; खस्ता कचोरी म्हणा किंवा शेगाव कचोरी करा या पद्धतीने, तोंडात विरघळेल अशी कचोरी

X
Kachori Recipe In Marathi ; मोजक्या टिप्स सह बनवा अशी कचोरी घरच्या घरी
Shreekala Abhinave16 Dec 2021 1:32 PM GMT
Kachori Recipe In Marathi ; खस्ता कचोरी म्हणा किंवा शेगाव कचोरी करा या पद्धतीने
Kachori Recipe In Marathi ; मोजक्या टिप्स सह बनवा अशी कचोरी घरच्या घरी
Kachori Recipe In Marathi ; तोंडात विरघळेल अशी कचोरी
कचोरी करण्यासाठी साहित्य (Kachori Recipe In Marathi)
- 3 कप मैदा
- 1 कप बेसन
- 1 टेबलस्पून धणे
- 1 टेबलस्पून बडीशोप
- 1/2 टेबलस्पून गरम मसाला
- 1/4 पाव टेबलस्पुन हळद
- चवीप्रमाणे मीठ
- दहा ते पंधरा लसून पाकळ्या
- पंधरा-सोळा हिरवी मिरची
- दीड इंच आलं
- तीन पळी तेल
कचोरी करण्याची कृती (Kachori Recipe In Marathi)
- एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये मैदा घ्या. त्यात दिलेल्या प्रमाणात साधे तेल आणि चवीनुसार मीठ घालून कोरडा मैदा मिक्स करून घ्या.
- त्यात बेताने पाणी घालून पीठ भिजवा. तयार झालेला हा गोळा 15 मिनिटे झाकून ठेवा.
- कचोरीच्या आतील मसाला तयार करण्यासाठी बडीशोप, धणे जाडसर दळून बाजूला ठेवा. त्यानंतर लसूण, मिरची, अद्रक यांची जाडसर पेस्ट करून घ्या.
- एका पॅनमध्ये एक पळी तेल गरम करून त्यात जिरं मोहरी, मिरची लसूण अद्रक घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या.
- या मिश्रणात धणे, बडीशेप कुट, गरम मसाला, हळद दिलेल्या प्रमाणावर बेसन घालून मंद गॅसवर चार ते पाच मिनिटे खमंग भाजून घ्यावे.
- अर्धा कप पाणी टाकणे चवीप्रमाणे मीठ बनवून सारण तयार करून ठेवा.
- थंड झाल्यावर मैद्याच्या गोळ्यात सारण भरून कचोरी सारखा आकार द्या आणि मध्यम आचेवर तळून घ्या.
- कचोरी मस्त कुरकुरीत खमंग तळल्या जाईल याची काळजी घ्या.
हे पण वाचा (Kachori Recipe In Marathi)
Next Story