Makka Poha Chivda Recipe In Marathi ; दिवाळी सणानंतरही टिकून राहणारा चटपटीत आणि खमंग मका पोहा चिवडा
Makka Poha Chivda Recipe In Marathi ;बाजारात मिळणारा चविष्ट मका पोहा चिवडा बनवा घरच्या घरी, चटकदार आणि कमी तेलात तयार झालेला मका पोहा चिवडा

X
Makka Poha Chivda Recipe In Marathi ; दिवाळी सणानंतरही टिकून राहणारा चटपटीत आणि खमंग मका पोहा चिवडा
Shreekala Abhinave3 Nov 2021 1:39 PM GMT
Makka Poha Chivda Recipe In Marathi ; बाजारात मिळणारा चविष्ट मका पोहा चिवडा बनवा घरच्या घरी
Makka Poha Chivda Recipe In Marathi ; दिवाळी सणानंतरही टिकून राहणारा चटपटीत आणि खमंग मका पोहा चिवडा
Makka Poha Chivda Recipe In Marathi ; चटकदार आणि कमी तेलात तयार झालेला मका पोहा चिवडा
मका पोहा चिवडा साहित्य
- मक्का पोहा - 400-450 ग्रॅम
- शेंगदाणे 250 ग्रॅम
- खोबऱ्याचे काप 1/4 वाटी
- खारी बूंदी 1/2 वाटी
- तेल तळण्यासाठी
- बडीशोप 2 टीस्पून
- अख्खे धणे 1 टीस्पून
- हिरवी मिरची - 10-12
- कढीपत्ता 1 वाटी
- पिठी साखर 100 ग्रॅम
- कश्मीरी लाल मिरची मिर्च पाउडर - 1 टीस्पून
- चाट मसाला - 1 टीस्पून
- अमचूर पावडर - 1 टीस्पून
- धणे पावडर - 1 टीस्पून
- मीठ चवीनूसार (1.5 टीस्पून)
- हळद पावडर - 1 टीस्पून
मका चिवडा बनविण्याची कृती
- एका पॅनमधे एक टीस्पून तेल घाला आणि शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्या.
- एका मिक्सिंग बाउल मध्ये कश्मीरी लाल मिरची मिर्च पाउडर - 1 टीस्पून, चाट मसाला - 1 टीस्पून, अमचूर पावडर - 1 टीस्पून, धणे पावडर - 1 टीस्पून, मीठ चवीनूसार (1.5 टीस्पून), हळद पावडर - 1 टीस्पून एकत्र करा.
- या मसाल्याचे दोन भाग करा, एक भाग शेंगदाणे भाजत असलेल्या पॅनमध्ये एकत्र करून गॅस बंद करा आणि दुसरा भाग तसाच बाजूला ठेवा.
- नमकीन झालेले शेंगदाणे बाजूला काढून ठेवा.
- एका मोठ्या कढईत तेल कडक गरम करा त्यात एक मूठ भरून मका पोहा टाकून पटकन तळून काढा.
- गॅस माध्यम आचेवर ठेवा. तळून काढलेल्या पोह्यावर मसाल्याचा दुसरा भाग थोडा थोडा करून घाला.
- जेणेकरून गरम पोह्यावर मसाला देखील भाजून निघेल.
- सगळे मके तळून झाल्यावर फोडणी पात्रात कढईतील २ चमचे तेल घ्या.
- ते मंद आचेवर गरम करा त्यात बडीशोप, हिरवी मिरची, अख्खे धणे, कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि पोह्यात टाका.
- तळलेले खोबऱ्याचे काप 1/4 वाटी, खारी बूंदी 1/2 वाटी, पिठी साखर 100 ग्रॅम घालून चांगले मिक्स करा.
- चिवडा थंड करून हवा बंद डब्यात भरून ठेवा.
हे पण वाचा
Next Story