Masale Bhat Recipe In Marathi ; लग्नातील पंगतीतील चविष्ट आणि रुचकर धर्मपरिक मसाले भात
Masale Bhat Recipe In Marathi ; साग्रसंगीत जेवणाला मसाले भाताचा उत्तम पर्याय, वन पॉट मिल म्हणजे झटपट होणार मसाले भात

X
Masale Bhat Recipe In Marathi ; लग्नातील पंगतीतील चविष्ट आणि रुचकर धर्मपरिक मसाले भात
Shreekala Abhinave9 Dec 2021 1:08 PM GMT
Masale Bhat Recipe In Marathi ; साग्रसंगीत जेवणाला मसाले भाताचा उत्तम पर्याय
Masale Bhat Recipe In Marathi ; लग्नातील पंगतीतील चविष्ट आणि रुचकर धर्मपरिक मसाले भात
Masale Bhat Recipe In Marathi ; वन पॉट मिल म्हणजे झटपट होणार मसाले भात
मसाले भातचा मसाला करण्याचे साहित्य (Masale Bhat Recipe In Marathi)
- 1 टीस्पून कोथिंबीर
- 1 स्टार फुल
- 2 टेबलस्पून मिळून धने - बडीशेप
- लवंगा
- 1 दालचिनीची काडी
- 1 चमचा तेल
- 1 टीस्पून मोहरी-जिरे
- 4~5 तमालपत्र
मसाले भात करण्याचे साहित्य (Masale Bhat Recipe In Marathi)
- 1 कांदा बारीक चिरलेला
- 1 टे.स्पून किसलेले आले,
- 2 हिरवी मिरची कापलेली
- 1 चमचा लाल मिरची पावडर
- 1 चमचा हळद पावडर
- 2 चमचा गोडा मसाला
- 1 वाटी फुलकोबी तुकडे
- 1 चिरलेला बटाटा
- 1 वाटी मिळून गाजर, मटार, टोमॅटो
- 1 टे. स्पून कच्चे शेंगदाणे
- 1 कप तांदूळ (बासमती नसलेला)
- 1 1/4 कप पाणी,
- चवीनुसार मीठ
- 1 टीस्पून तूप (पर्यायी)
- गार्निश करण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, ओल्या नारळाचा किस
मसाले भातचा मसाला करण्याची कृती (Masale Bhat Recipe In Marathi)
- सर्वप्रथम मध्यम आचेवर पॅन गरम करा. त्यात धणे, 1 स्टार फुल, बडीशेप, लवंगा आणि 1 दालचिनीची काठी 4-5 मिनिटे कोरडी भाजून घ्या.
- मसाले थंड झाल्यावर मिक्सरमध्ये रवाळ वाटून काढा.
- एक मोठ्या पसरट भांड्यात 2 टेबलस्पून तेल गरम करा. त्यात मोहरी जिरे टाका ते तडतडल्यावर 3 तमालपत्र घाला.
- 2 मिनिटाने कांदा घालून परतावा. 4-5 मिनिटे शिजवा. त्यात किसलेले आले, चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, तिखट, हळद, गोडा मसाला प्रमाणानुसार घाला.
- व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून चांगले परतवून घ्या एक मिनिट शिजवा.
- या मसाल्यात पहिल्यांदा बटाटा आणि फुलकोबीचे तुकडे मिक्स करा. झाकण ठेवून 4-5 मिनिटे शिजवून घ्या.
- त्यानंतर उरलेल्या भाज्या गाजर, मटार, श्रावणी घेवड्याच्या बिया, टोमॅटो आणि कच्चे शेंगदाणे घाला. चांगले मिक्स करा आणि 5 मिनिटे शिजवा.
- पाण्यातून तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. तांदूळ बासमती वगळता कोणताही कोलम (सुरती कोलम) घाला.
- 1 कप तांदुळाला दीड कप पाणी घाला. चवीनुसार मीठ आणि सगळ्यात आधी तयार केलेला मसाला घाला.
- हलक्या हाताने मिक्स करून पहिली 5 मिनिटे मोठ्या आचेवर आणि नंतरची 10 मिनिटे मंद आचेवर भात शिजवून घ्या.
- त्यात 1 टेबलस्पून साजूक तूप (पर्यायी) घाला. भात शिजल्यावर सव्र्ह करताना तुप, कोथिंबीर, ओल्या नारळाचा किस वर घाला.
हे पण वाचा (Masale Bhat Recipe In Marathi)
Chocolate Cake Recipe In Marathi
Next Story