Mumbai Pav Bhaji Recipe In Marathi ; रुचकर पाव भाजी बनवा घरच्या घरी
Mumbai Pav Bhaji Special Recipe In Marathi : चौपाटीवर मिळणारी चवदार पावभाजी करा अशा प्रकारे होतील सगळेच खुश. तेही कमीतकमी साहित्यात

X
Mumbai Pav Bhaji Recipe In Marathi ; रुचकर पाव भाजी बनवा घरच्या घरी
Shreekala Abhinave5 Oct 2021 10:09 AM GMT
Mumbai Pav Bhaji Recipe In Marathi ; रुचकर पावभाजी करण्याची घरगुती पद्धत मोजक्या साहित्यात तेही घरच्या घरी
Mumbai Pav Bhaji Tasty Recipe In Marathi : अशा प्रकारे करा चौपाटीवर मिळणारी चवदार पावभाजी
- साहित्य:
3 मोठे बटाटे
1/2 कप फुलकोबीचे फुल
1 बारीक चिरलेला शिमला मिर्च
1/2 कप मटार
2 ~ 3 टीस्पून किसलेले बीट रूट
पाणी
बटर1 बारीक चिरलेला कांदा
1 बारीक चिरलेला टोमॅटो
1 टेबलस्पून पाव भाजी मसाला
1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
1 टेबलस्पून काश्मिरी लाल तिखट
चवीनुसार मीठ
लादी पाव- कृती : कुकरच्या एका भांड्यात बटाटे घ्या आणि पाणी घाला आणि दुसऱ्या भांड्यात फ्लॉवर, भोपळी मिरची, मटार, किसलेला बीट आणि पाणी घाला.• बीटमुळे भाजीला सुरेख रंग येतो. त्या निमित्ताने बीट शरीरात जाते. दोन्ही भांडी कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या काढून घ्या. भाज्या मॅशरने चांगल्या मॅश करा. बटाबटाट्यांची साले काढून मॅश केलेल्या भाजीत किसून घ्या. भाजीचे हे मिश्रण चांगले एकत्र मिसळा. कढईत बटर गरम करा त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि सुमारे 7-8 पर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्या. त्यांनतर बारीक चिरलेला टोमॅटो, 1 टेबलस्पून पाव भाजी मसाला, आले-लसूण पेस्ट, 1 टेबलस्पून काश्मिरी लाल तिखट घालून मसाला 4-5 मिनिटे छान आणि मऊ होईपर्यंत शिजवा. जेव्हा मसाला तेल सोडू लागेल तेव्हा शिजवलेल्या भाज्यांमध्ये पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करावे. भाजी साधारण 8-10 मिनिटे मध्यम आचेवर भाजी न झाकता शिजवा. भाजी शिजल्यावर सर्व्ह करताना थोडे बटर घाला.
मसाला पाव करण्यासाठी पाव मधोमध चिरून दोन्ही बाजूंनी बटर लावून घ्या. भाजी केलेल्या कढईत मधोमध थोडेसे बटर, अर्धाचमचा पावभाजी मसाला घाला. त्यावर पाव भाजून घ्या.
- टीप : संपूर्ण पाव भाजी मध्यम आचेवर करावी.
Next Story