Janmarathi

Mutton Biryani Recipe In Marathi ; अशी करा मटण बिर्याणी विसरून जाल हॉटेलचा स्वाद

Mutton Biryani Recipe In Marathi ; रुचकर आणि चविष्ठ मटण बिर्याणी घरच्या घरी, ही पद्धत वापरा बिर्याणी होईल स्वादिष्ट

Mutton Biryani Recipe In Marathi ; अशी करा मटण बिर्याणी विसरून जाल हॉटेलचा स्वाद
X

Mutton Biryani Recipe In Marathi ; अशी करा मटण बिर्याणी विसरून जाल हॉटेलचा स्वाद

Mutton Biryani Recipe In Marathi ; रुचकर आणि चविष्ठ मटण बिर्याणी घरच्या घरी

Mutton Biryani Recipe In Marathi ; अशी करा मटण बिर्याणी विसरून जाल हॉटेलचा स्वाद

Mutton Biryani Recipe In Marathi ; ही पद्धत वापरा बिर्याणी होईल स्वादिष्ट

Mutton Biryani Recipe In Marathi ; ही पद्धत वापरा बिर्याणी होईल स्वादिष्ट

मटण बिर्याणी करण्याचे साहित्य : (Mutton Biryani Recipe In Marathi)

 • मटण: 500 ग्रॅम
 • बासमती तांदूळ 500 ग्रॅम
 • दही 200 ग्रॅम
 • कांदा 2 मध्यम कट
 • आले-लसूण पेस्ट 3 चमचे
 • मीठ 2 चमचे
 • लाल तिखट 1 टेस्पून
 • धणे पावडर 2 चमचे
 • हळद पावडर 1 टेस्पून
 • मटण मसाला 1 टेस्पून
 • गरम मसाला 1 टेस्पून
 • टोमॅटो 2 बारीक चिरून
 • हिरवी मिरची 4
 • पुदिन्याची पाने मूठभर (गार्निशसाठी)
 • ताजी कोथिंबीर मूठभर (गार्निशसाठी)
 • कुरकुरीत तळलेले कांदे (गार्निशसाठी)
 • तमालपत्र 4
 • जिरे 2 चमचे
 • काळी मिरी 1 टेस्पून
 • दालचिनीची काठी 1 इंच
 • लवंग 7-8
 • हिरवी वेलची 4
 • काळी वेलची 2
 • तेल 1/4 किलो
 • फूड कलर 2 (लाल/पिवळा)
 • केवडा पाणी 2-3 चमचे (सुवासासाठी)
 • देशी तूप: 2-3 चमचे.

मटण बिर्याणी करण्याची कृती (Mutton Biryani Recipe In Marathi)

  • एका मोठ्या टोपात शक्यतो जाड बुडाच्या असल्यास उत्तम. व्यवस्थित स्वच्छ धुतलेले अर्धा किलो मटण घ्या.
  • त्यात टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मटण मसाला, 1 चमचा मीठ, २ चमचे जिरे, पाव चमचा काळी मिरी, 4 लवंगा आणि 200 ग्रॅम दही घाला.
  • हा मसाला चांगला मटणाला चोळून मॅरीनेट होण्यासाठी 2 तास बाजूला ठेवा.
  • रात्रभर मॅरीनेट केले तरी चालेले. बिर्याणीचा भात तयार करण्यासाठी बासमती तांदूळ देखील 1 तास पाण्यात भिजवून ठेवा.
  • एका मोठ्या कढईत रिफाइंड 4 टेबलस्पून तेल घाला आणि गरम करा.
  • त्यात सुके मसाले जिरे, 2-3 लवंगा, 2 तमालपत्र, 3-4 हिरवी वेलची घालून काळी मिरी दिलेल्या प्रमाणानुसार घाला.
  • खडे मसाले तडतडायला लागले कि त्यात चिरलेला कांदा घाला. कांदा तांबूस होत आल्यावर त्यात टोमॅटो घाला.
  • मूठभर कोथिंबीर आणि पुदिना घाला. 2 मोठे चमचे मीट मसाला, लाल तिखट घाला. मटण कुकरमध्ये घालून 3 शिट्या काढून घ्या.
  • तसेच सोबत मोठ्या टोपात पाणी उकळवायला ठेवा. त्यातही काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, थोडेसे तूप आणि भिजवलेला तांदूळ घाला.
  • त्यात मीठ आणि लिंबाचा रस घाला. भात 70 टक्के शिजवून घ्या.
  • कुकरमध्ये शिजवलेले मटण एका मोठ्या टोपात ओता त्यावर शिजवलेला भात लेअर करा.
  • तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना टाकून झाकण ठेवून गॅस चालू करा आणि 5 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा आणि पुढील आणखी 15 मिनिटे गॅस मंद करून शिजवा.
  • बिर्याणी पूर्ण शिजल्यावर फूड कलरचे काही थेंब तसेच केवडा इसेन्स, 2-3 चमचे देशी तूप घालून सर्व्ह करा.

  हे पण वाचा (Mutton Biryani Recipe In Marathi)

  Fish Fry Recipe In Marathi

  Gajar Halwa Recipe In Marathi

  Dal Tadka Recipe In Marathi

  Next Story