Janmarathi

Paneer Biryani Recipe In Marathi ; दिवाळीचा गोड धोड फराळ खाऊन बोर झाला असाल तर करा अशी दमदार पनीर बिर्याणी

Paneer Biryani Recipe In Marathi ; दिवाळीचा गोड धोड फराळ खाऊन बोर झाला असाल तर करा अशी दमदार पनीर बिर्याणी, घरगुती पार्टीसाठी बेस्ट स्वादिष्ट पर्याय पनीर बिर्याणी

Paneer Biryani Recipe In Marathi ; दिवाळीचा गोड धोड फराळ खाऊन बोर झाला असाल तर करा अशी दमदार पनीर बिर्याणी
X

Paneer Biryani Recipe In Marathi ; दिवाळीचा गोड धोड फराळ खाऊन बोर झाला असाल तर करा अशी दमदार पनीर बिर्याणी 

Paneer Biryani Recipe In Marathi ; घरगुती पार्टीसाठी बेस्ट पर्याय स्वादिष्ट पनीर बिर्याणी


Paneer Biryani Recipe In Marathi ; दिवाळीचा गोड धोड फराळ खाऊन बोर झाला असाल तर करा अशी दमदार पनीर बिर्याणी


Paneer Biryani Recipe In Marathi ; अप्रतिम आणि झटपट होणारी शाकाहारी लोकांसाठी पनीर बिर्याणी
पनीर बिर्याणी मसाला साहित्य


 • तेल 2 टेबलस्पून
 • 1 काळी वेलची
 • बेलीफ 2 नग
 • जिरे 2 टीस्पून
 • दालचिनी 2"इंच
 • वेलची 6-7 नग
 • कांदा चिरलेला - अडीच कप
 • हळद - 1 टीस्पून
 • मिरची पावडर - 1 टीस्पून
 • धने पावडर - 2 चमचे
 • लसूण पेस्ट - 2 चमचे
 • आले पेस्ट - 1 टीस्पून
 • दही - ½ कप
 • टोमॅटो प्युरी (ताजी) - 1 कप
 • हिरवी मिरची - 2 नग
 • मीठ - चवीनुसार
 • कसुरी मेथी 2 टीस्पून

पनीर बिर्याणी मसाला कृती


 • एक खोलगट नॉनस्टिक कढई घ्या. त्यात 2 टेबलस्पून तेल घाला. वेलची, तेजपत्ता, जिरे, दालचिनी, कांदा मध्यम आचेवर परतवून घ्या.
 • कांदा परतेपर्यंत पनीरला मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.
 • तुकड्यावर मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट स्प्रिंकल करा.
 • कढईत कांदा परतत असताना हळद, लाल तिखट, धने पावडर, आले लसूण पेस्ट प्रमाणानुसार टाका.
 • दोन चमचे दही घाला.
 • टोमॅटो पुरी, हिरवी मिरची, कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, केवरा पाणी 2 चमचे, गुलाबजल 2 चमचे घाला आणि. सगळा मसाला चांगला भाजून घ्या.
 • एका पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करा आणि पनीरचे तुकडे शॅलोफ्राय करून घ्या. पनीर जास्त गरम करू नका.
 • बिर्याणी भातासाठी बासमती तांदूळ 2 कप घ्या.
 • ते अर्धातास पाण्यात भिजवून ठेवा. अर्धातास भिजल्या नंतर एका मोठ्या पातेल्यात 4 कप पाणी कडक गरम करा त्यात मीठ 3 टीस्पून, हिरव्या मिरच्या 2 नग, बेलीफ 1, वेलची 4-5 नग टाकून पाणी कडक उकळवून घ्या.
 • भात 50 टक्के शिजवून घ्या. मोकळा भात बाजूला काढा.
 • पनीर बिर्याणी असेंबलिंगसाठी एका मोठ्या भांड्याच्या तळाशी तयार केलेला बिर्याणी मसाला घाला.
 • त्यावर पनीर चे तुकडे, गरम मसाला ½ टीस्पून, कोथिंबीर चिरलेली, मूठभर पुदिन्याची पाने, त्यावर अर्धा शिजवलेला भात, तूप 2 चमचे, थोडंसं भात शिजवलेलं अर्धा कप पाणी त्यात ओता, भांड्याच्या बाजूने पीठ लावून भांडं सील करा.
 • पहिली दोन मिनिटे मोठ्या आचेवर, दुसरी १० मिनिटे दम वर शिजवा आणि पुढील १० मिनिटे गॅस बंद करून तसेच ठेवा. चविष्ट पनीर बिर्याणी खाण्यासाठी सज्ज.


हे पण वाचा


Biryani Masala Recipe In Marathi

Manchurian Rice Recipe In मराठी

Kothimbir chi Vadi Recipe In मराठी

Anda Biryani Recipe In Marathi

Next Story