जगभरात लोक करत आहेत या विविध आहार पद्धतीचे अनुसरण, माहिती करून घ्या यांच्याबद्दल.
शाकाहारी, विगन, पॅस्कटेरियन, मांसाहारी अशा अनेक नवनवीन आहार पद्धतीचे अनुसरण आजच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने केले जात आहे.

X
Pratiksha Pogulwad11 March 2021 6:45 AM GMT
सध्या जगभरात आरोग्याबाबत विशेष दाखल घेतली जात आहे. त्यामध्ये आहार, विहार, विचार या सर्वच बाबतीत नवनवीन बदल केले जात आहेत, नवनवीन संकल्पना आत्मसात केल्या जात आहेत. योगा, मेडिटेशन, डिटॉक्सिकेशन, क्रूलटी फ्री प्रसाधने इ. संकल्पना आता घरोघरी ओळखीच्या होत आहेत. त्याचबरोबर आहाराच्या पध्दत्तीमध्ये देखील नावीन्य आहेते आहे. पूर्वी केवळ शाकाहार व मांसाहार या दोनच प्रकारात मोडणारी आहारपद्धती पाळणारे लोक आपण पाहायचो आता यात बरेच प्रकार निम्हण होऊ लागले आहेत.
- शाकाहार- हा भारतीयांना परिचित असणारा प्रकार आहे. यात मांस सोडून इतर वनस्पती, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश होतो. भारतात जवळपास हिंदू, जैन, इ घरांमध्ये हि आहारपद्धती पाहायला मिळते.
- मांसाहार- यात प्राण्यांच्या माणसापासून बनलेल्या अन्नपदार्थाचा समावेश होतो. मानव या प्रकारचा आहार अनादी काळापासून घेत आला आहे. जगभरामद्ध्ये सर्वत्र हि आहारपद्धती दिसून येते.
- विगन- या आहारपद्धतीमध्ये केवळ वनस्पतींच्या माध्यमातून मिळालेल्या वस्तूंचा समावेश केला जातो.कोणत्याही प्रकारच्या प्राणिजन्य पदार्थांचा यात वापर केला जात नाही अगदी दूध, दुधापासून बनलेले पदार्थ, मध इ. पदार्थ देखील खाल्ले जात नाहीत. आता पर्यावरणातील सर्वाच प्राण्यांच्या बचावासाठी, हिंसा टाळण्यासाठी, आहार संतुलित ठेवण्यासाठी अशा विविध कारणाने या पद्धतीला लोक आत्मसात करत आहेत. भारतातहि आता हि संकल्पना आता मोठ्या प्रमाणात दिसून येते.
- पासकेटेरियन- या प्रकारात शाकाहार व केवळ मासे किंवा तत्सम जीवांचा समावेश होतो. इतर कोणत्याही प्राण्याच्या मासाचा वापर केला जात नाही.
- एगियटेरियन- यामध्ये जे लोक वनस्पती, प्राणिजन्य पदार्थ परंतु कोणत्याही प्रकारच्या प्राण्याचे मास न खाता अंड्यांचा समावेश यांच्या आहारात करतात ते लोक येतात.
आजकाल बरेच लोक या व अशा नवीन आहार पद्धतींचे अनुसरण करत आहेत. काही लोक केवळ दूध व दुधापासून बनलेल्या पदार्थांना वगळतात, काही निवडक प्राण्यांचेच मास आहारात घेणे पसंत करतात. अशा अनेक गोष्टीचे प्रयोग केले जात आहेत. त्यामागे उद्देश व कारणे मात्र व्यक्तिपरत्वे बदलताना दिसतात.
Next Story