Prawns Biryani Recipe In Marathi ; नॉनव्हेज पार्टीची जान असलेली प्रॉन्स बिर्याणी
Prawns Biryani Recipe In Marathi ; टेस्टी आणि झणझणीत प्रॉन्स बिर्याणी कमीत कमी वेळेत बनणारी, मोजक्या वस्तू वापरून चाविष्ट होणारी कोळंबी बिर्याणी

X
Prawns Biryani Recipe In Marathi ; नॉनव्हेज पार्टीची जान असलेली प्रॉन्स बिर्याणी
Shreekala Abhinave26 Nov 2021 10:07 AM GMT
Prawns Biryani Recipe In Marathi ; टेस्टी आणि झणझणीत प्रॉन्स बिर्याणी कमीत कमी वेळेत बनणारी
Prawns Biryani Recipe In Marathi ; नॉनव्हेज पार्टीची जान असलेली प्रॉन्स बिर्याणी

प्रॉन्स बिर्याणीसाठी साहित्य (Prawns Biryani Recipe In Marathi)
- कोळंबी - 350 ग्रॅम
- बासमती तांदूळ - 500 ग्रॅम
- तळलेले कांदे - ३
- चिरलेला कांदा - 1
- टोमॅटो - 1
- पुदिना कोथिंबीर (1 वाटी)
- हिरव्या मिरच्या 3
- लसूण पाकळ्या 5
- इंच आले 1
- लिंबू 2
- हळद 1 टीस्पून
- लाल मिरची पावडर 2 टीस्पून
- जिरे पावडर 1 टीस्पून
- बिर्याणी मसाला - 2 टीस्पून
- खडा मसाले 2 तमालपत्र, 5 मिरी कॉर्न, 4 लवंगा, 1 इंच दालचिनी, 3 हिरवी वेलची, 1 टीस्पून काळे, 1 टीस्पून जिरे
- मीठ चवीनुसार
- तूप 5 टेबलस्पून
प्रॉन्स बिर्याणीची कृती (Prawns Biryani Recipe In Marathi)
- प्रॉन्स बिर्याणी करायला घेण्याआधी तांदूळ 1 तास भिजत ठेवा.
- कोळंबी स्वच्छ करून त्यात हळद, तिखट, जिरे/धणे पावडर, बिर्याणी मसाला पावडर, 2 लिंबाचा रस आणि मीठ घालून मॅरीनेट करायला ठेवा.
- 1.5 लिटर पाणी उकळवायला ठेवा त्यात 2 चमचे तूप गरम, खडा मसाला दिलेल्या प्रमाणात घाला.
- उकळत्या पाण्यात तांदूळ घाला आणि दोन मिनिटे मोठ्या आचेवर उकळत ठेवा.
- मीठ घालून भात ८० टक्के शिजवून घ्या. दुसऱ्या भांड्यात तेल गरम करा त्यात कांदा घाला. तो पारदर्शक होईपर्यंत परतवून घ्या.
- त्यात हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट घाला. या पेस्टचा कच्चा वास निघेपर्यंत ती परतवून घ्या.
- चिरलेला टोमॅटो घाला मऊ होईपर्यंत शिजवा. मॅरीनेट केलेले कोळंबी घाला. झाकण ठेवून 15 मिनिटे मंद आचेवर शिजवा.
- 15 मिनिटांनंतर जड तवा ठेवा त्यावर कोळंबी शिजत असलेला टॉप ठेवा. भाताची लेअर घाला.
- तळलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीर पाने पसरवा. टोपात बाजूने तूप टाका आणि 30 मिनिटे डम द्या.
हे पण वाचा
Next Story