Rava Cake Recipe In Marathi ; या घरगुती पदार्थात होईल इजिप्तची खासियत असलेला बासबुसा केक
Rava Cake Recipe In Marathi ; कापसासारखा मऊ आणि लुसलुशीत रवा केक होईल या पदार्थामुळे, असा करा चटकदार रवा केक इराणी हॉटेलमध्ये मिळतो तसा

X
Rava Cake Recipe In Marathi ; या घरगुती पदार्थात होईल इजिप्तची खासियत असलेला बासबुसा केक
Shreekala Abhinave10 Dec 2021 11:52 AM GMT
Rava Cake Recipe In Marathi ; कापसासारखा मऊ आणि लुसलुशीत रवा केक होईल या पदार्थामुळे
Rava Cake Recipe In Marathi ; या घरगुती पदार्थात होईल इजिप्तची खासियत असलेला बासबुसा केक
Rava Cake Recipe In Marathi ; असा करा चटकदार रवा केक इराणी हॉटेलमध्ये मिळतो तसा
रवा केक बनवण्याचे साहित्य (Rava Cake Recipe In Marathi)
- बारीक रवा 1+1/4 कप
- साखर 1/2 कप
- तेल 1/3 कप
- डेसिकेटेड नारळ 1/2 कप
- दूध 1 कप
- बेकिंग पावडर 1 टीस्पून
- व्हॅनिला एसेन्स 1/4 टीस्पून
- सुका मेवा
साखरेचा पाक करण्यासाठी (Rava Cake Recipe In Marathi)
- साखर 1/2 कप
- पाणी 1/2 कप
- लिंबाचा तुकडा 1 लहान
- केशरच्या काड्या
रवा केक करण्याची कृती (Rava Cake Recipe In Marathi)
- मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये रवा, पिठी साखर, तेल आणि डेसिकेटेड नारळ दिलेल्या प्रमाणानुसार एकत्र घेऊन मिक्स करा.
- त्यानंतर थोडे थोडे दूध घालून कोरडे मिश्रण पातळ करून घ्या.
- केकचे मिश्रण साधारण 20 मिनिटे झाकून ठेवा. रवा दुधात फुलून येईल.
- घरात OTG असल्यात तो 180 डिग्रीवर प्रीहीट करून घ्या. त्यानंतर केकच्या बॅटरमध्ये बेकिंग पावडर आणि काही थेंब व्हॅनिला इसेन्स घालून एकजीव करा.
- केक टिनला बटरने ग्रीस करा त्यावर थोडासा , रवा आणि डेसिकेटेड नारळ भुरकावा. वरती बदामाचे काप घाला.
- OTG मध्ये 180 डिग्रीवर 20-25 मिनिटे बेकिंग साठी ठेवा.
- केक 20 मिनिटांनंतर तपासा आणि तो बेक झाला असेल तर OTG बंद करा.
- साखर आणि पाणी 1/2 कप प्रमाणत घेऊन एका पॅनमध्ये गरम करा त्यात पाव लिंबू पिळा, केशर काड्या घाला.
- साखर फक्त पाण्यात वितळवून घ्यायची आहे तार असलेला पाक करायचा नाही.
- हे शुगर सिरप बनवून केकवर चमच्याने ओता.
- कुकरमध्ये देखील हा केक होऊ शकतो. कुकरची शिटी काढून त्याच्या तळाशी एक स्टॅन्ड ठेवा त्यावर केक ठेवून 30 मिनिटे बेक करून काढा.
- अशाप्रकारे तयार होईल रवा केक घरच्या घरी सहज. हा सुपर टेस्टी आणि स्पंज केक मूळतः बासबूसा केक म्हणून ओळखला जातो आणि तो इजिप्तची खासियत आहे
हे पण वाचा (Rava Cake Recipe In Marathi)
Next Story