Samosa Recipe In Marathi ; चटपटीत समोसा कमी तेलातील आणि चविष्ट, खुसखुशीत आणि स्वादिष्ट समोसा पार्टीसाठी उत्तम मेनू
Samosa Recipe In Marathi ; चवीमध्ये कोणताही फरक येणार नाही चटकदार समोसे घरच्या घरी

X
Samosa Recipe In Marathi ; चटपटीत समोसा कमी तेलातील आणि चविष्ट, खुसखुशीत आणि स्वादिष्ट समोसा पार्टीसाठी उत्तम मेनू
Shreekala Abhinave8 Oct 2021 10:06 AM GMT
Samosa Recipe In Marathi ; चटपटीत समोसा कमी तेलातील आणि चविष्ट, खुसखुशीत आणि स्वादिष्ट समोसा पार्टीसाठी उत्तम मेनू
Samosa Recipe In Marathi ; चवीमध्ये कोणताही फरक येणार नाही चटकदार समोसे घरच्या घरी
- सामोसाच्या आवरणासाठी साहित्य (samosa recipe in marathi)
1 टीस्पून ओवा
अर्धा चमचा मीठ
6 चमचे नॉर्मल तेल मोहन साठी
1 कप पाणी
कृती ; (samosa recipe in marathi)
एका पातेल्यात 2 कप मैदा टाका त्यात 1 टीस्पून ओवा, अर्धा चमचा मीठ, 6 चमचे कोणतेही खाद्य तेल नॉर्मल तेल मोहन म्हणून टाका. सर्व साहित्य एकत्र करून घ्या आणि आणि थोडे थोडे पाणी टाकून घट्ट मळून घ्या. पिठाचा गोळा अर्धा तास झाकून ठेवा.
- भाजीचे साहित्य आणि कृती (samosa recipe in marathi)
5 बटाटे उकडून कुस्करलेले
4 टेबलस्पून तेल
1 टीस्पून अक्खे धने, जिरे,
अर्धा चमचा हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, धने पावडर, हिंग
8 मिरच्या
थोडीशी कोथिंबीर,
1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट
मीठ
कृती ; (samosa recipe in marathi)
सर्व प्रथम जिरे, धणे, मिरची आलं- लसूण, हिंग जाडसर वाटून घ्या. एका कढईत 4 टेबलस्पून तेल टाका. तेल गरम झाल्यावर वाटलेला ठेचा कढईत घाला. त्यात अर्धा चमचा हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, धने पावडर टाका. मसाले करपू नये म्ह्णून थोडेसे पाणी घाला. त्यात हाताने कुस्करकारलेले 5 बटाटे घाला. चवी नुसार मीठ घाला. मसाला थोडासा आंबट हवा असेल तर पाव लिंबू पिळा. भाजी चांगली परतून घ्या. भाजी पूर्णपाने थंड करून घ्या आणि मैद्याची त्रिकोणी परी करून त्यात भरा. मध्यम आचेवर तळून घ्या.
हे पण वाचा
Next Story