Soyabean Biryani Recipe In Marathi ; अशा प्रकारे करा सोयाबीन बिर्याणी चुटकीसरशी संपेल
Soyabean Biryani Recipe In Marathi ; नॉनव्हेज बिर्याणीलाही टक्कर देईल अशी सोयाबीन बिर्याणी, पॊष्टिक आणि चविष्ट

X
Soyabean Biryani Recipe In Marathi ; अशा प्रकारे करा सोयाबीन बिर्याणी चुटकीसरशी संपेल
Shreekala Abhinave27 Nov 2021 12:07 PM GMT
Soyabean Biryani Recipe In Marathi ; नॉनव्हेज बिर्याणीलाही टक्कर देईल अशी सोयाबीन बिर्याणी
Soyabean Biryani Recipe In Marathi ; अशा प्रकारे करा सोयाबीन बिर्याणी चुटकीसरशी संपेल
Soyabean Biryani Recipe In Marathi ; पॊष्टिक आणि चविष्ट सोयाबीन बिर्याणी
सोयाबीन बिर्याणीसाठी साहित्य (Soyabean Biryani Recipe In Marathi)
- 650 ग्रॅम बासमती तांदूळ
- 150 ग्रॅम सोया चंक्स (सोयाबीन)
- 1 टीस्पून शहा जिरे
- 4 वाटलेल्या हिरव्या मिरच्या
- 2 चमचे ठेचलेले आले आणि लसूण
- 2 टीस्पून लाल मिरची पावडर
- 1 टीस्पून हळद पावडर
- 50 ग्रॅम मटार
- 50 ग्रॅम बेबी कॉर्न
- 50 ग्रॅम फ्रेंच बीन्स
- 100 ग्रॅम फ्लॉवर
- 50 ग्रॅम गाजर
- 50 ग्रॅमदुधी
- 1 कप पुदिन्याची पाने
- 500 ग्रॅम चिरलेला कांदा
- हिरवी पेस्ट - 7/8 लसूण पाकळ्या, 2" आले, 4/5 हिरवी मिरची, मूठभर ताजी कोथिंबीर
- तेल
सोयाबीन बिर्याणीची कृती (Soyabean Biryani Recipe In Marathi)
- सर्वप्रथम कांदा बिर्याणीसारखा सोनेरी रंगावर तळून बाजूला ठेवा. एक मोठ्या पातेल्यात प्रमाणात तांदळाच्या दुप्पट पाणी घ्या.
- पाण्याला उकळी आल्यावर त्यात प्रमाणात दिलेला खडा मसाला घाला आणि तांदूळ घाला.
- सोबत एका पातेल्यात सोयाबीन भिजायला घाला. भिजलेले सोयाबीन पाण्यासोबत गॅसवर ठेवा आणि 10 मिनिटे शिजवून घ्या.
- दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यात 5 टेबलस्पून तेल गरम करून घ्या.
- त्यात शहाजिरे, 4 हिरव्या मिरच्या, 2 चमचे ठेचलेले आले लसूण, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद पावडर घाला आणि चांगले परतवून घ्या.
- मसाला जळणार नाही याची काळजी घ्या. लगोलग सगळ्या भाज्या घालून घ्या.
- भाज्या झाकून शिजवून घ्या. त्याचबरोबर भिजवलेले सोयाबीन घाला. भाजी सोबत परतवून घ्या.
- त्यात दही आणि थोडीशी साखर घाला मीठ भाजी पुरते घाला. भाजीत थोडेसे पाणी घाला.
- त्यावर अर्धवट शिजवलेला भात घाला त्यावर कोथिंबीर, तळलेला कांदा घाला.
- त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून घ्या. बिर्याणीच्या बाजूने तूप घालून घ्या.
हे पण वाचा (Soyabean Biryani Recipe In Marathi)
Next Story