Spicy Egg Biryani Recipe In Marathi ; चिकन बिर्याणी खाऊन कंटाळा आला असले तर नक्की करून पहा अशी बिर्याणी
Spicy Egg Biryani Recipe In Marathi ; झटपट होणारी अंडा बिर्याणी करा स्पेशल लंचसाठी, टेस्टी आणि लज्जतदार अंडा बिर्याणी

X
Spicy Egg Biryani Recipe In Marathi ; चिकन बिर्याणी खाऊन कंटाळा आला असले तर नक्की करून पहा अशी बिर्याणी
Shreekala Abhinave1 Dec 2021 11:46 AM GMT
Spicy Egg Biryani Recipe In Marathi ; झटपट होणारी अंडा बिर्याणी करा स्पेशल लंचसाठी
Spicy Egg Biryani Recipe In Marathi ; चिकन बिर्याणी खाऊन कंटाळा आला असले तर नक्की करून पहा अशी बिर्याणी
Spicy Egg Biryani Recipe In Marathi ; टेस्टी आणि लज्जतदार अंडा बिर्याणी
अंडा बिर्याणी करण्याचे साहित्य ; (Spicy Egg Biryani Recipe In Marathi)
- उकडलेली अंडी 6
- तेल 4-5 टेबलस्पून
- तळून घेतलेला कांदा 1 मोठा
- हळद 1/2 टीस्पून
- लाल मिरची पावडर 1 टीस्पून
- मीठ चवीनुसार
- धणे पूड 1 टीस्पून
- गरम मसाला पावडर 1/2 टीस्पून
- बिरयानी मसाला 2 टीस्पून
- तांदूळ 2 कप
- कोथिंबीर, पुदिना, साजूक तूप 2 टीस्पून
- तमालपत्र 2
- हिरवी वेलची 3
- दालचिनी 1
- मसाला वेलची 1
- काळी मिरी 6-7
- उभा पातळ चिरलेला कांदा 3 मध्यम आकाराचे
- बारीक चिरलेला टोमॅटो 1
- आले लसुण पेस्ट 1 टीस्पून
अंडा बिर्याणी करण्याची कृती ; (Spicy Egg Biryani Recipe In Marathi)
- सर्व प्रथम 1 मोठा कांदा उभा चिरुन तळून घ्या. त्यानंतर एक दुसऱ्या पातेल्यात पाणी गरम करा आणि त्यात प्रमाणानुसार दिलेला खडा मसाला घाला आणि उकळी काढून घ्या.
- उकळी आल्यावर त्यात भिजवलेला तांदूळ शिजयला घाला.
- त्याचबरोबर एक मोठ्या पॅनमध्ये बिर्याणी मसाला ]तयार करून घेण्यासाठी उकडलेल्या अंड्याना फोकने टोचवून आणि पाव चमचा हळद, मिरची, मीठ लावून घ्या.पॅनमध्ये थोडेसे तेल घ्या आणि अंडी 2 मिनिटे त्यात फ्राय करून घ्या.
- त्याच पॅनमध्ये खडामसाला प्रमाणानुसार घाला उभा चिरलेला कांदा, 3 मिरच्या, 3 टोमॅटो आणि 1 टीस्पून आले लसूण पेस्ट घाला आणि परतवून घ्या. हे मिश्रण मऊ आणि एकजीव करून घ्या.
- अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची, जिरे धणे पावडर, तळलेला कांदा, अर्धा कप दही आणि मसाले एकत्र करून झाकून वाफ काढून घ्या.
- मसाल्याला तेल सुटायला लागल्यावर त्यात अर्धा कप पाणी घाला आणि गॅस मोठा करून उकळी काढून घ्या.
- पुदीना आणि बिर्याणी मसाला कोथिंबिरीची पाने घाला आणि अंडी एकत्र करून थोडीशी वाफ काढून घ्या.
- नव्वद टक्के भात शिजवलेला असावा. बिर्याणीला दम देण्यासाठी जाड तळाचे भांडे घ्या त्याच्या तळाशी 1 टेबलस्पून तेल घाला.
- सुरवातीचा थर पातळ भाताचा लावा त्यावर केश दूध, साजूक तूप, पुदीना आणि कोथिंबिरीची पाने अंडबिर्याणी मसालाचा थर द्या.
- अशाच प्रकारे दोन टप्प्यात थर लावून घ्या. सुरुवातीची पाच मिनिटे टोप थंड असल्यामुळे गॅस मोठा करून गरम करून घ्या.
- कणकेच्या पीठाने झाकण सील करून पुढील 10 मिनिटे मंद आचेवर बिर्याणीला ड्रम द्या.
- ही बिर्याणी कुकरमध्ये शिटी काढून देखील याच पद्धतीने करता येते.
हे पण वाचा (Spicy Egg Biryani Recipe In Marathi)
Kolhapuri Misal Recipe In Marathi
Next Story