Instant Besan Dhokla recipe in marathi ; इन्स्टंट मायक्रोव्हेव ढोकळा
Microwave instant dhokla as snackes item ; ढोकळा स्टीम करायचा आला असेल तर करा मायक्रोव्हेव मध्ये

X
don't worry about recipe for Dhokla ढोकळा खायचाय मग टेन्शन कशाला, कशा अशी झटपट रेसिपी
Shreekala Abhinave2021-10-02 09:18:20.0
मायक्रोव्हेवमध्ये बेसन ढोकळा करण्याची पद्धत
- साहित्य : 1 1/2 कप बेसन , 1 टी स्पून बारीक रवा, 3/4 कप दही, 1/3 कप पाणी, 1/4 टीस्पून हळद पावडर, मीठ चवी पुरते, 1 टीस्पून तेल, मिरची-आलं- लसणाची पेस्ट, 1 1/2 टी स्पून इनो, राई, दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या, हिंग कढीपत्ता पाने, 1/2 साखर

- कृती ; 1 1/2 कप चण्याच्या डाळीचे पीठ (बेसन) मोठ्या पातेल्यात घ्या. त्यात 3/4 कप दह्यात 1/3 कप पाणी घाला. पातळ केलेले दही बेसन पिठात घाला आणि एकाच दिशेने ढवळा. कोणत्याही गुठळी शिवाय पोरिंग कन्सिस्टन्सी पीठ तयार करा. त्याच चवीनुसार मीठ, हळद आणि 1 टी स्पून तेल, मिरची-आले- लसूण ठेचा चवीनुसार, 1 1/2 टी स्पून इनो घाला. इनोवार अर्धा चमचा पाणी घाला जेणेकरून तो ऍक्टीव्हेट होईल. पुन्हा पीठ ढवळा, ते थोडंसं फसफसल्यासारखं दिसेल. एका मायक्रोवेव्ह ट्रेच्या तळाशी तेल लावा. त्यात ढोकळ्याचं बॅटर ओता आणि डबा काहीसा टॅप करून घ्या. त्यातील हवा निघून जाईल. 5 मिनिटे मायक्रोव्हेवमध्ये कुक करा. वेळ संपल्यावर ट्रे बाहेर काढून लगेच डिमोल्ड करू नका. काहीसा थंड झाल्यावर ट्रे मध्ये ढोकळ्याचे पीस करा. त्यावर 1 टी स्पून तेल, हिंग, पाव काप पाणी, 1/2 साखर टाकून फोडणी ढोकळ्यावर टाका आणि मग पीस बाहेर काढून पपईच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
- टीप : इडलीचे भांडे ऐवजी मायक्रोवेव्ह अधिक सोयीस्कर ठरते.
Next Story