Tikhat Appe Recipe In Marathi ; तिखट आप्पे रोजच्या ब्रेकफास्ट मधील न्यूलुक
Tikhat Appe Recipe In Marathi ; तिखट आप्पे रोजच्या ब्रेकफास्ट मधील न्यूलुक, प्रवासात नेण्यासाठी उत्तम आणि टिकावू रेसिपी

X
Tikhat Appe Recipe In Marathi ; तिखट आप्पे रोजच्या ब्रेकफास्ट मधील न्यूलुक
Shreekala Abhinave2021-10-07 13:54:07.0
Tikhat Appe Recipe In Marathi ; तिखट आप्पे रोजच्या ब्रेकफास्ट मधील न्यूलुक
Tikhat Appe Recipe In Marathi ; प्रवासात नेण्यासाठी उत्तम आणि टिकावू रेसिपी
- साहित्य (Tikhat Appe Recipe In Marathi)
१ कप तांदूळ
अर्धा कप मूग डाळ
अर्धा कप चणा डाळ
अर्धा कप उडीद डाळ
बारीक चिरलेला १ कांदा,
बारीक चिरलेला १ टोमॅटो
दोन मोठे चमचे दही
२ मिरच्या
कोथिंबीर
चवी नुसार
पाव चमचा हळद, लाल तिखट
तेल, पाणी
- कृती (Tikhat Appe Recipe In Marathi)
एका बाऊलमध्ये साहित्यात दिलेले धान्य एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत ५ ते ६ तास पाण्यात भिजवल्यानंतर वाटून घ्या. वाटलेले मिश्रण रात्रभर आंबवण्यासाठी बाऊलमध्ये झाकून ठेवा. आंबलेले मिश्रण चांगले फेटून घ्या. त्यात १ लहान बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, २ मिरच्या, पाव चमचा हळद, लाल तिखट घाला. मिश्रण चांगले ढवळून घ्या. आप्पे त्या पात्रात थोडेसे तेल घालून चांगले गरम करून घ्या. त्यानंतर मिश्रण आप्पे पात्रात टाका. आप्पे दोन्हो बाजूने भाजून घ्या. खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
हे पण वाचा
Next Story