Upma Recipe In Marathi ; पौष्टिक भाज्या आणि चमचमीत असलेला उपमा
Upma Recipe In Marathi ; मऊ लुसलुशीत चविष्ट उपमा नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

X
Upma Recipe In Marathi ; पौष्टिक भाज्या आणि चमचमीत असलेला उपमा
Shreekala Abhinave20 Dec 2021 1:47 PM GMT
Upma Recipe In Marathi ; मऊ लुसलुशीत चविष्ट उपमा नाश्त्यासाठी
Upma Recipe In Marathi ; पौष्टिक भाज्या आणि चमचमीत असलेला उपमा

Upma Recipe In Marathi ; मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
उपमा करण्याचे साहित्य ; Upma Recipe In Marathi
- 1 कप रवा
- 1 कप कांदा बारीक चिरलेला
- 1 टोमॅटो बारीक चिरलेला
- कोथिंबीर
- 1/2 टीस्पून मोहरी
- 10-12 कढीपत्ता
- 1/2 लिंबाचा रस
- 3-4 हिरव्या मिरच्या
- चवीनुसार मीठ
- 1/2 टीस्पून उडीद डाळ
- नारळ
- 1/2 टीस्पून साखर
- 3-4 टेबलस्पून तेल
- 2 कप पाणी
उपमा करण्याची कृती ; Upma Recipe In Marathi
- स्वच्छ निवडून घेतलेला १ कप बारीक रवा हलका सोनेरी रंगावर भाजून घ्या.
- बारीक रवा नसल्यास जाड रवा मिक्सर मध्ये फिरवून घ्या.
- रवा भाजून झाल्यावर बाजूला काढा.
- एका कढईत 2 टेबलस्पून तेल तापवा आणि त्यात उडद डाळ, राई, जिरे, बारीक चिरलेली मिरची, कडीपत्ता घालून फोडणी परतून घ्या.
- ही फोडणी परतून झाल्यावर त्यात कांदा घाला आणि हलका मऊ झाल्यावर त्यात 1 टोमॅटो घाला.
- टोमॅटो मऊ होण्यासाठी तोडीस मीठ घाला.
- तसेच कोथिंबीर, बारीक चिरलेला गाजर, ओला वाटाणा, बारीक चिरलेली फरस बी सुद्धा घालू शकता.
- फोडणी आणि त्यातील भाज्या मऊ झाल्यावर भाजलेला रवा घाला आणि एकजीव करून घ्या.
- रवा एकजीव झाल्यावर त्यात उकळते पाणी घालून उपमा ढवळून घ्या.
- रव्यात पाणी मुरल्यावर त्यावर झाकण ठेवून 3 मिनिटे वाफेवर शिजवून घ्या.
- उपमा सुटसुटीत होईल आणि चांगला फुलून देखील येईल.
- गॅस बंद करून प्लेटमध्ये काढलेल्या उपमावर बारीक शेव घालून गार्निश करा.
हे पण वाचा (Upma Recipe In Marathi)
Next Story