Veg Pulao Recipe In Marathi ; व्हेज पुलाव करा अशा प्रकारे नक्की होईल टेस्टी
Veg Pulao Recipe In Marathi ; चमचमीत व्हेज पुलाव करा घरच्या घरी,

X
Veg Pulao Recipe In Marathi ; व्हेज पुलाव करा अशा प्रकारे नक्की होईल टेस्टी
Shreekala Abhinave20 Dec 2021 2:42 PM GMT
Veg Pulao Recipe In Marathi ; चमचमीत व्हेज पुलाव करा घरच्या घरी
Veg Pulao Recipe In Marathi ; व्हेज पुलाव करा अशा प्रकारे नक्की होईल टेस्टी

Veg Pulao Recipe In Marathi ; व्हेज पुलाव म्हणजेच वन पॉट मिल
व्हेज पुलाव बनविण्याचे साहित्य (Veg Pulao Recipe In Marathi)
- तांदूळ 250 ग्रॅम
- फ्लॉवर, मटार आणि पनीर मिळून 1 मोठी वाटी
- कोथिंबीर
- गाजर, बीन्स 1/2 वाटी
- 2 हिरव्या मिरच्या
- 10 कढीपत्ता
- 10 लसूण पाकळ्या
- 1 इंच आले
- 100 ग्रॅम दही
- 4 ते 5 टेबलस्पून तेल आणि तूप
- मीठ चवीनुसार
- 4 हिरवी वेलची
- 2 काळी वेलची
- 1 इंच दालचिनीची काठी
- 3 लवंगा
- 4 मिरपूड
- 4 तमालपत्र
- 3/4 टीस्पून जिरे
- 1/2 टीस्पून हळद पावडर
- 1 टीस्पून लाल तिखट
- 1 टीस्पून जिरे
- गरम मसाला पावडर 1 टीस्पून
व्हेज पुलाव बनविण्याची कृती (Veg Pulao Recipe In Marathi)
- पाव किलो तांदूळ सर्वप्रथम 2 तास पाण्यात भिजवून ठेवलेले तांदूळ घ्या.
- एका मोठ्या टोपात 750 मिली पाणी उकळवा.
- कुकरमध्ये किंवा मोठ्या टोपात तेल आणि तूप 3 टेबलस्पून गरम करा.
- त्यात प्रमाणानुसार खडे मसाले, जिरे, हिरवी मिरची, ठेचलेला लसूण आणि आले आणि कढीपत्ताची फोडणी करा आणि परतून घ्या.
- एका वेगळ्या पॅनमध्ये पनीर हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्या.
- हे पनीर बाजूला काढून ठेवा. प्रमाणानुसार सर्व भाज्या घाला आणि मिक्स करून घ्या.
- अर्धवट शिजवून घेतलेले तांदूळ हळुवारपणे मिक्स करा.
- पनीर आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
- हवं असल्यास टोपात थोडंसं पाणी घाला भात शिजण्यासाठी.
- पुलाव प्रेशर कुकरमध्ये शिजवत असल्यास 10 मिनिटे शिजवा आणि 2 शिट्ट्या काढा.
- पुलाव रायता आणि सॅलड सोबत सर्व्ह करा.
हे पण वाचा (Veg Pulao Recipe In Marathi)
Next Story