Janmarathi

Bitter Gourd: या कारणांमुळे कडू कारले डायबिटीजच्या रूग्णांसाठी आहे 'रामबाण औषध', जाणून घ्या कारल्याचे फायदे........!

Bitter Gourd: या कारणांमुळे कडू कारले डायबिटीजच्या रूग्णांसाठी आहे रामबाण औषध, जाणून घ्या कारल्याचे फायदे........!
X

Bitter Gourd: या कारणांमुळे कडू कारले डायबिटीजच्या रूग्णांसाठी आहे 'रामबाण औषध', जाणून घ्या कारल्याचे फायदे........!

मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे, जीवनशैली खराब असेल तर मधुमेह होण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ, ज्या लोकांना योग्य आहार मिळत नाही. त्यांना मधुमेह होण्याचा धोका वाढतो. जे लोक लठ्ठ आहेत ते खूप लवकर आजारी पडतात. मधुमेह झाल्यानंतर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेह झाल्यानंतर रुग्णाने योग्य आहार घेतला नाही तर त्याच्या शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम होऊ लागतात. मधुमेहापासून बचाव करण्यात कारल्याचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्ण आपल्या रोजच्या आहारात कारल्याचा रस आणि भाज्यांचा समावेश करू शकतात.

१) मधुमेह

जेव्हा शरीराच्या स्वादुपिंडात इन्सुलिनची कमतरता भासते किंवा स्वादुपिंड इन्सुलिन तयार करणे पूर्णपणे थांबवते. इंसुलिनचे काम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे आहे. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेची म्हणजेच ग्लुकोजची पातळी वाढू लागते. या स्थितीला मधुमेह म्हणतात. इन्सुलिनबद्दल बोलायचे झाले तर हा एक प्रकारचा हार्मोन आहे, जे शरीरातील पाचक ग्रंथीपासून बनते. आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की मधुमेह नियंत्रणात कारल्याची भूमिका काय आहे?

२) कारल्याचे फायदे.......

कारल्यामध्ये अँटीबायोटिक, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय यामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म देखील आहेत. यामध्ये असलेले चरेंटिन रक्तातील ग्लुकोज पातळी कमी करण्याचे काम करते. पॉलिपेप्टाइड-पी किंवा पी-इन्सुलिन देखील कारल्यामध्ये आढळते. हे नैसर्गिक पद्धतीने साखर नियंत्रित करण्याचे काम करते. कारल्याचा रस देखील खूप फायदेशीर मानला जातो. रस तयार करण्यासाठी ताजे कारले सोलून घ्या. नंतर त्याचे छोटे तुकडे करून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर कारले ज्युसरमध्ये टाका. त्यात थोडा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मीठ घाला. तुम्ही त्याचे सेवन करू शकता.

Next Story