बॉलिवूडमधील ही न्यूट्रिशनिस्ट सांगतेय स्पेशल टीप या गंभीर आजारावर
Dietician of Bollywood celebs sharing following tips ; बघुयात काय आहेत या आजरांवर जालीम घरगुती उपाय

X
Shreekala Abhinave27 Sep 2021 11:58 AM GMT
हिंदी सिनेमातील टॉप अभिनेत्रीची आहे डाएटिशियन सांगतेय घरगुती उपचार
भरपूर पाणी प्या
डेंग्यू सारख्या गंभीर व जीवघेण्या संसर्गातून लवकर बरे होण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पाणी. डेंग्यू झाल्यास तुम्ही शक्य तितके जास्तीत जास्त पाणी पिणे सुरू ठेवा. तसेच तुमच्या लघवीच्या रंगाकडे लक्ष द्या. जर लघवीचा रंग योग्य असेल तर ती दिलासा देणारी बाब आहे.
हळद, दूध, जायफळ व केसर
हळद, दूध, जायफळ आणि केशर, हे सर्व खाद्यपदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. हळदी मध्ये अँटिइनफ्लमेट्री आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि दुधात कर्क्युमिन असतं. त्यामुळे आपण दुधात किंवा पाण्या मध्ये हळद घालू शकता. सोबतच त्यात जायफळ आणि केशर सुद्धा मिसळू शकता. ते पाण्यात किंवा दुधात उकळा. केशर, हळद आणि जायफळ पाणी किंवा दुधात घालून उकळवा. हे तोपर्यंत उकळवा तोपर्यंत ते आटून अर्धे होत नाही. आता एकतर ते थंड झाल्यावर प्या किंवा गरमा गरमच प्या. चांगली चव येण्यासाठी तुम्ही यात गुळ घालू शकता, यामुळे तुम्हाला शरीरावर येणा-या सूज व वेदनां पासूनही आराम मिळेल.
तांदळाची कांजी (पाणी)
तुम्हाला कदाचित माहित असेल की डेंग्यूच्या समस्ये दरम्यान डॉक्टर तुम्हाला भरपूर पाणी, ज्यूस आणि इतर पेय पदार्थ पिण्याचा सल्ला देतात. हे तुमचं शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करतं. तर दुसरीकडे, ऋजुता दिवेकर म्हणते की डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या डासां पासून होणाऱ्या संसर्गापासून आराम मिळवण्यासाठी तांदळाची कांजी किंवा तांदळाची पेज उपयुक्त ठरू शकते. वास्तविक तांदळाची कांजी हे तांदळापासून बनवलेले एक टेस्टी व खूप पौष्टिक सूप असते. तुम्ही त्यात काळे मीठ, सैंधव मीठ आणि चिमूटभर हिंग घालू शकता. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या नुकसाना पासून आराम मिळू शकतो. याव्यतिरिक्त ही पेज भूक वाढवण्यासाठी देखील मदत करू शकते.
गुलकंद
गुलकंद तुम्हाला डेंग्यू आणि याच्याशी संबंधित अनेक समस्या कमी करण्यात मदत करू शकतो. ऋजुताच्या मते, गुलकंद डोकेदुखी, अनियमित झोप, अशक्तपणा, मळमळ आणि डेंग्यूच्या अनेक लक्षणांवर सकारात्मक परिणाम दाखवतो आणि लवकर बरं होण्यासाठी उपयोगी ठरतो. सहसा डॉक्टर देखील सकाळी सकाळी गुलकंद खाण्याचा सल्ला देताना दिसतात. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जेवणा दरम्यान याचे सेवन करु शकता. ऋजुताच्या मते, एक छोटा चमचा गुलकंद खाल्ल्याने खूप फरक दिसू शकतो.
योगा
जर तुम्हाला डेंग्यूच्या संसर्गामुळे होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही सुप्त बद्धकोणासन करावे. या आसना दरम्यान तुम्ही मान आणि कंबरेला आधार देण्यासाठी ब्लँकेटचा देखील वापर करू शकता. याव्यतिरिक्त डेंग्यू मध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कीवी, ड्रॅगन फ्रुट्स आणि इतर अनेक फळांचे सेवन करावे. यामुळे लवकर आराम पडतो.
Next Story