Janmarathi

Combiflam Tablet Uses In Marathi ; किरकोळ आजारावर गुणकारी असलेल्या कॉम्बिफ्लेम गोळीचे जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

Combiflam Tablet Uses In Marathi ; Combiflam ही गोळी सर्व सामान्य आजारांवर गुणकारी आहे. त्याचा वापर रोजच्या जगण्यात केला जातो. डॉक्टरांमार्फत देखील या गोळीचा अधिकृत रित्या वापर केला जातो. या गोळीच्या सेवनाने किरकोळ आजार बरे होण्यास मदत होते मात्र ही टॅबलेट शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना अपाय करू शकते. तसेच गरोदर आणि स्तनदा माता आणि मासिक पाळीच्या दिवसांत या गोळीबद्दल डॉक्टरांचे काय म्हणणे आहे हे सुद्धा आपण या लेखात पाहणार आहोत.

Combiflam Tablet Uses In Marathi ; पहा डॉक्टर काय सांगतात कॉम्बिफ्लेम या गोळीबाबत कोणाला आहे उपयुक्त आणि कोणाला आहे धोकादायक
X

Combiflam Tablet Uses In Marathi ; पहा डॉक्टर काय सांगतात कॉम्बिफ्लेम या गोळीबाबत कोणाला आहे उपयुक्त आणि कोणाला आहे धोकादायक

Combiflam Tablet Uses In Marathi ; किरकोळ आजारावर गुणकारी असलेल्या कॉम्बिफ्लेम गोळीचे जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

प्रस्तावना (Combiflam Tablet Uses In Marathi)

Combiflam ही गोळी सर्व सामान्य आजारांवर गुणकारी आहे. त्याचा वापर रोजच्या जगण्यात केला जातो. डॉक्टरांमार्फत देखील या गोळीचा अधिकृत रित्या वापर केला जातो. या गोळीच्या सेवनाने किरकोळ आजार बरे होण्यास मदत होते मात्र ही टॅबलेट शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना अपाय करू शकते. तसेच गरोदर आणि स्तनदा माता आणि मासिक पाळीच्या दिवसांत या गोळीबद्दल डॉक्टरांचे काय म्हणणे आहे हे सुद्धा आपण या लेखात पाहणार आहोत.

Combiflam Tablet Advantage In Marathi ; पहा डॉक्टर काय सांगतात कॉम्बिफ्लेम या गोळीबाबत कोणाला आहे उपयुक्त आणि कोणाला आहे धोकादायक

combiflam Tablet Disadvantage In Marathi ; ही गोळी करु शकते शरीरातील हे महत्त्वपूर्ण अवयव निष्क्रिय

कॉम्बिफ्लेम गोळी आहे या आजारावरील उपचारासाठी (Combiflam Tablets Advantage In Marathi)

  • विषाणूजन्य ताप (वायरल फिव्हर) 100°F पर्यंत असल्यास या गोळीचा एक डोस फायदेशीर ठरतो. मात्र या पेक्षा अधिक ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • सर्वसाधारण डोकेदुखी किंवा अंगदुखीवर देखील ही गोळी वापरता येते. या गोळीत पेन रिलीफ कंटेन्ट असल्याने काहीसा आराम मिळू शकतो.
  • गाऊट म्हणजे रक्तात युरीक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यामुळे वेदनाकारक संधीवात होतो. त्याकरिता आणि ऑस्टियोआर्थराइटिस साठी देखील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही गोळी घेता येऊ शकते.
  • गुडघेदुखी किंवा संधिवातच्या दुखण्यात कॉम्बिफ्लेम कायमस्वरूपी आराम देईल याची खात्री देता येत नाही त्याकरीता संबंधित डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे.
  • रूट कॅनल किंवा दात काढण्याआधी दात दुखी होत असल्यास या गोळीचा दुखणे कमी करण्यासाठी वापर केला जातो. या औषधाचे सतत सेवा देखील धोकादायक आहे. डेन्स्टिस्टचा सल्ला उपयुक्त आहे.
  • कोणत्याही कारणामुळे शरीरातील स्नायू दुखवला गेला असेल तर कॉम्बिफ्लेम गोळी मसल्स रिलॅक्सींगसाठी उपयुक्त ठरते मात्र अधिक काळ स्नायू दुखी होत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
  • कॉम्बिफ्लेम च्या गोळीचा परिणाम शरीरावर 30 ते 60 मिनिटांत दिसायला लागतो आणि प्रभाव 4 ते 6 तासापर्यंत कायम असतो.

कॉम्बिफ्लेम औषधामुळे हे दुष्परिणाम किंवा अपाय होण्याची शक्यता आहे ( combiflam Tablet Disadvantage In Marathi)

  • हार्टबर्न, यकृत आणि मूत्रपिंड या अतिशय महत्त्वाच्या आणि नाजूक अवयवांवर या गोळीचा परिणाम होतो मात्र अतिशय संथ गतीने. कॉम्बिफ्लेमचे सेवन सातत्याने असल्यास हा धोका उद्भवू शकतो.
  • मानवी शरीरात बनत असलेल्या साइक्लो-ऑक्सीज़नेज एंजाइम मध्ये कॉम्बिफ्लेम हे औषध अडथळा आणते. ज्यामुळे प्रोस्टाग्लैंडिंसच्या प्रक्रियेत देखील त्रुटी येतात. प्रोस्टाग्लैंडिंसमुळे शरीरात दुखणे आणि सुज येते. मात्र कॉम्बिफ्लेमच्या सेवनाने साइक्लो-ऑक्सीज़नेज एंजाइमची प्रक्रिया थांबते आणि परिणामस्वरूप रुग्णाचे दुखणे कमी होते.
  • मात्र यामुळे पोटातील आतल्या बाजूला सूज येणे, चक्कर येणे, मळमळणे, अतिसार यासारखे दुष्परिणाम देखील जाणवू शकतात. बद्धकोष्ठता पोटावर ताण येणे त्यामुळे मुळव्याधी सारखे दुखणे येऊ शकते.
  • गरोदरपणात कॉम्बिफ्लेम औषध घातक मानले आहे. या गोळीच्या सेवनाने पोटातील बाळाच्या वाढीवर आणि बाळाच्या शारीरिक गुणवत्तेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. पाळीतील दिवसाच्या दरम्यान या गोळीच्या सेवनाबद्दल डॉक्टर देखील विशेष सकारात्मक प्रतिक्रिया देत नाहीत. त्यामुळे याचा वापर टाळणे योग्य राहील.

कॉम्बिफ्लेम गोळीचे सेवन / उपयोग अशा प्रकारे करावा (Combiflam Tablet Uses In Marathi)

  • कॉम्बिफ्लेम टॅबलेट चा डोस घेताना रुग्णाचे वय २ ते ८० वर्ष यामध्ये असावे. रुग्णाला इतर कोणत्या व्याधी किंवा आजार आहेत का हे तपासून पाहावे. जसं की अस्थमा, बीपी, डायबिटीज, म्हणून औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
  • हे औषध पाण्याच्या मदतीने गिळून घ्यावे. गोळीला चघळून किंवा पाण्यात विरघळवून पिऊ नये.
  • कॉम्बिफ्लेम टॅबलेट पोटभर जेवणानंतर घेतलेले अधिक उत्तम.
  • ही टॅबलेट घेतल्यानंतर दारू किंवा इतर कोणतेही नशा करणारे पदार्थ सेवन करू नये.
  • कॉम्बिफ्लेम घेतल्यावर गुंगी किंवा झोप येते त्यामुळे कुठेही प्रवास अथवा वाहन चालवणे असुरक्षित आहे.

निष्कर्ष ; (Combiflam Tablets Uses In Marathi)

जनमराठी.कॉम ही वेबसाईट कॉम्बिफ्लेम औषध विषयी सर्वसामान्य माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. वाचकांनी लेखात दिलेल्या औषधाचा अथवा गोळीचा वापर करण्याआधी आपल्या नजीकच्या प्रशिक्षित डॉक्टरांचा सल्ला कटाक्षाने घ्यावा. या लेखात दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. तसेच ही माहिती शक्य झाल्यास शेअर करा. |

Next Story