Janmarathi

पन्नाशीत पडलेल्या टक्कलामुळे काळजी करू नका हे आहेत रामबाण उपाय

Indian remedy to solve the hail bold problem. नैसर्गिक रित्या केसांची वाढ होईल केस गळालेल्या ठिकाणी ही आहेत औषधी

पन्नाशीत पडलेल्या टक्कलामुळे काळजी करू नका हे आहेत रामबाण उपाय
X
या पद्धतींचा करा वापर पन्नाशी नंतर गेलेले केस पुन्हा येण्यास मिळेल मदत
वयानुसार टक्कल पडणे यात काही नवीन नाही मात्र गेलेल्या केसांमुळे आपल्या दिसण्यात नक्कीच फरक पडतो. अधिक वयस्कर दिसणे किंवा आत्मविस्वास कमी वाटणे यासारखे न्यूनगंड उद्भवतात. यावर उत्तम आणि कोणत्याही घातकी पर्याय न वापरता घगूती पदार्थ वापरून ही अडचण दूर करू शकता. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी घटना असते. टक्कल पडलेल्या डोक्यावर पुन्हा केस उगवतील का? या प्रश्नाचे उत्तर या लेखात मिळविणार आहोत. टक्कल पडलेल्या जागी पुन्हा केस उगवू शकतात ते सुद्धा कोणत्याही हेअर ट्रांसप्लांटेशन शिवाय! तेलाचा योग्य वापर आणि नीट काळजी घेतली तर टक्कल पडलेल्या डोक्यावर केस येऊ शकतात आणि केसांचे गळणे पूर्णपणे रोखले जाऊ शकते. जर तुमच्या केस गळती मागे कोणतीही अन्य गंभीर वैद्यकीय समस्या नसेल तरखूप औषधांचे सेवन करणेही टळू शकते. कमी वेळात व घरच्या घरी केस पहिल्यासारखे काळेभोर, लांबसडक व घनदाट बनवण्यासाठी उपाय!
टक्कल पडल्याची लक्षणे
तुम्हाला टक्कल पडत आहे याचा पहिला संकेत असतो केस खूप जास्त गळणे आणि नवीन केस उगवण्याची ग्रोथ कमी असणे वा अजिबातच केस न उगवणे. याशिवाय डोक्यावर वेगवेगळ्या ठिकाणी केस विरळ होऊ लागतात. ही लक्षणे दिसल्यास तुम्ही लागलीच आपल्या केसांची काळजी घ्यायला सुरुवात करावी. जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावरचे केस खूप जास्त गळाले असतील वा पूर्ण टक्कल पडले असेल तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात.
  • जैतूनचे तेल लावणे.
टक्कल दूर करण्यासाठी तुम्ही विविध घरगुती उपाय करू शकता. यातील पहिली पद्धत आहे डोक्यावर जैतूनचे तेल लावणे. जैतूनचे तेल म्हणजेच ओलिव्ह ऑईल घेऊन ते कोमट होईपर्यंत थोडे तपावे आणि त्यात एक चमचा मध टाकून व एक चमचा कडूनिंबाचे तेल टाकून मिक्स करावे. हे मिश्रण नंतर डोक्यावर लावावे आणि 20 ते 25 मिनिटांनी केस धुवून घ्यावे. आठवड्यातून दोन वेळा तरी हा उपाय करावा यामुळे चांगले परिणाम काही दिवसांत दिसू लागतील.
  • एरंडेल तेल लावावे
कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेल केसांसाठी वरदान आहे. जेव्हा तुमच्या केसांवरचे टक्कल वाढू लागेल तेव्हा तुम्ही एरंडेलचे तेल योग्य प्रमाणात घेऊन त्यात सम प्रमाणात नारळ आणि आवळा तेल मिक्स करून हे तेल केसांना आणि डोक्याला लावावे दर दिवशी रात्री झोपण्याआधी डोक्यावर हे तेल लावून सकाळी उठून शॅम्पू करावा. जर रोज हा उपाय करणे शक्य नसेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करावा .तुम्हाला महिन्याभरात या उपायाने फरक दिसून येऊ शकतो.
  • एका दिवसात खूप वेळा लिंबू लावावा

डोक्यावर ज्या जागीचे केस झडत असतील त्या जागी एका दिवसातून दोन ते तीन वेळा लिंबू लावावा. असे केल्याने केसांची ग्रोथ पुन्हा सुरु होते. डोक्यावर पूर्ण टक्कल पडले तरी तुम्ही हा उपाय वापरू शकता. प्रत्येक वेळी लिंबू लावल्यानंतर केस धुवायलाच हवे असे काही नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा तुमचे केस धुवू शकता. पण प्रत्येक दिवशी अंघोळीच्या आधी केसांना लिंबू रस लावल्याने खूप जास्त फायदा होऊ शकतो. जाणकार सुद्धा हा एक प्रभावी उपाय असल्याचे सांगतात.
  • महत्त्वाच्या टेस्टटक्कल का पडत आहे हे जाणून घेण्यासाठी कधी कधी तुम्हाला डॉक्टर टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात. यात वर्तमान लक्षणांसह तुमची मेडिकल हिस्ट्री आणि डीटेल्सचा वापर करून ते निष्कर्ष काढतात. यातून केस गळतीचे योग्य कारण समोर येते आणि त्यानुसार उपाय केले जाऊ शकतात. याशिवाय काही महत्त्वपूर्ण टेस्ट सुद्धा केल्या जातात. जसे की पूल टेस्ट होय. यामध्ये डोक्याच्या एका भागातील काही केस खेचले जातात यातून जे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो की हलका जोर लावून खेचल्यावर सुद्धा किती केस तुटतात? ब्लड टेस्ट करून सुद्धा हे शोधले जाते की शरीरात कोणती तत्वे कमी आहेत जी केस गळतीसाठी आणि टक्कल पडण्यासाठी कारणीभूत आहेत. बायोप्सी करून पेशी आणि तंतू मधील बदल लक्षात घेऊन त्या प्रमाणे उपचार पद्धती केली जाते.
Next Story