Janmarathi

रक्तवाढीसाठी दररोजच्या आहारात ठेवा या काही गोष्टी आणि लगेच दिसून येतील प्रकृतीत हे बदल.

विविध कारणांनी वयाच्या कोणत्याही टप्प्यात रक्तात कमतरता झाली असल्यास ती भरून काढण्यासाठी करता येतात आहारात हे काही बदल.

रक्तवाढीसाठी दररोजच्या आहारात ठेवा या काही गोष्टी आणि लगेच दिसून येतील प्रकृतीत हे बदल.
X

मानवाच्या शरीरामध्ये महत्वाचा समजला जाणारा घटक म्हणजे रक्त होय. मानवी शरीराला चालवण्याचे कार्य रक्त करत असते.शरीरात प्राणवायूचा पुरवठा रक्तात असलेला हिमोग्लोबिन हा घटक करत असतो ऑक्सीजन या हिमोग्लोबिन सोबत बद्ध होत असतो. तसेच यकृतातील ग्लुकोज, अमिनो आम्ल, मेदाम्ल, यांचा पुरवठा देखील रक्त करत असते. कार्बन डायऑक्साईड , युरिया, लॅक्टिक आम्ल , इ . टॉक्सिक घटकांना काढून टाकण्याचे काम रक्तामार्फत होत असते. शरीराचे तापमान नियंत्रण, प्रतिकार शक्ती, शरीराची दुरुस्ती करणे, शरीरातील हॉर्मोन्स चे संवहन करणे अशी अनेक महत्वाची कार्ये रक्तातुन होत असतात. परंतु आजच्या असंतुलित, आहारामुळे योग्य पोषण मिळत नसल्याने रक्ताची कमतरता हि वाढती समस्या बनत चालली आहे.

या कामातरतेला भरून काढण्यासाठी, सुधृढ आरोग्यासाठी आपल्याला आहारात काही बदल करणे आता गरजेचे आहे. हे बदल आपल्याला सहज शक्य असून त्यांच्यासाठी विशेष वेळ काढण्याची गरज नाही.

  • बीट - आहारात बीटचा समावेश केल्याने हिमोग्लोबिन ची कमतरता भरून निघते. आठवड्यातून किमान दोन वेळा सलाद, ज्यूस, पराठे अशा कोणत्याही प्रकारे याचे सेवन आपणास करता येते.
  • डाळिंब - डाळिंब हे रसाच्या माध्यमाने न घेता थेट खाणे कधीही योग्य असते त्याने अधिक फायदा होतो. डाळिंब हे गर्भवती मातांच्या आरोग्याला देखील लाभदायक असते.
  • पालक - पालक हि आयर्न ने भरपूर असल्याने ऍनिमिया सारख्या रोगांमध्ये देखील मदत करते. आयुर्वेदामध्ये देखील पालक चे महत्व सांगितले आहे. पालक सर्व रोगांमध्ये लाभकारी ठरते.
  • खजूर - खजूर आपण फळ व सुकामेवा अशा दोन्ही स्वरूपात खाऊ शकतो. गोड चवीमुळे याचा वापर विविध पक्वान्नांमध्ये आपण करतो. महिलांच्या आरोग्यात खजुराने मोठे फायदे होऊ शकतात.
  • गाजर - गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असल्याने त्याचे बरेच फायदे होतात. डोळे, त्वचा यांना फायदेशीर असणारे गाजर रक्तवाढीसाठी योग्य आहे.
  • टोमॅटो - दररोजच्या आहाराचा भाग असलेला टोमॅटो हा व्हिटॅमिन सी व हिमोग्लोबिनचे पुरवठा आपल्या शरीराला करत असतो.
  • गुळ - हा लोहाचा आहारातील मुख्य पुरवठा करणारा घटक तसेच हिमोग्लोबिन वाढीसाठी मदतशीर आहे . गरम असल्याने याचा वापर सर्दी खोकल्यासाठी देखील केला जातो.
  • काळे मनुके - लोहाचे प्रमाण यामध्ये अधिक असते तसेच शरीराचे तापमान देखील यांच्या दररोच्या सेवनाने आटोक्यात राहते. सर्व ऋतूंमध्ये हे लाभदायक ठरतात.

हिमोलॉबीन, लोह , व्हिटॅमिन सी, यांच्या कमतरतेसाठी औषधे घेण्यापेक्षा आपल्या दररोजच्या आहारात अशा काही घटकांचा समावेश करून आरोग्य सुधारता येऊ शकते.

Next Story