Janmarathi

पुण्यात आणखी बारा कोविड- 19 लसीकरण केंद्रांची भर, आतापर्यंत जवळपास 80 केंद्र.

2.05 लाख जणांना आतापर्यंत लस मिळाली आहे. पुणे सर्कल मध्ये पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पुण्यात आणखी बारा कोविड- 19 लसीकरण केंद्रांची भर, आतापर्यंत जवळपास 80 केंद्र.
X

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे लसीकरणाचे काम देखील चालू आहे. पुण्यामध्ये कोविद -१९ लस घेण्यास येणाऱ्यांची संख्या आता वाढूलागल्याने नवीन केंद्रांची गरज भासू लागली आहे. त्यासाठी आता १२ नवीन लसीकरण केंद्रांची भर पडणार आहे. त्यासाठी ४१ खाजगी हॉस्पिटल्सची निवड करण्यात येत आहे.

राज्य सरकारला, केंद्राकडून या लसीकरण केंद्राबाबतचे सर्व अधिकार देण्यात आले असल्याचे आरोग्य अधिकाऱयांनी सांगितले आहे. या नवीन केंद्रांची निवड राज्यसरकारने, लसीकरणासाठी मोठी जागा, लसीसाठी कोल्ड स्टोरेजची उपलब्धता, मदतीसाठी लागणार संताची उपलब्धता, निकडीचे प्रसंग सांभाळण्याची योग्यता या आधारावर केली आहे.

पुणे सर्कलच्या अंतर्गत पुणे , सातारा, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुणे जिल्ह्यामध्ये हि १२ केंद्रे असतील. त्यामध्ये के. ई. एम . हॉस्पिटल, एम.आय.एम. आर . हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल यांचा समावेश असेल. या १२ च्या समावेशानंतर पुण्यात आता जवळपास ८० केंद्र उपलब्ध आहेत जेथे लस देण्याचे काम केले जात आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात २.०५ लाख लोकांना लस देण्यात आली आहे.

Next Story